जेजुरी : राज्यभरात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांची धामधूम सुरू असून, विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, पुण्याच्या जेजुरीमध्ये या जल्लोषाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी विजयाचा आनंद साजरा करत असताना भंडाऱ्याचा भीषण भडका उडाला, ज्यामध्ये काही कार्यकर्ते आणि भाविक भाजले गेल्याची माहिती समोर आली आहे. जेजुरीत स्थानिक निवडणुकांची मतमोजणी पार पडल्यानंतर निकाल जाहीर झाले. विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते गडाच्या पहिल्या पायरीजवळ एकत्र आले होते. कुलदैवत खंडेरायाला भंडारा अर्पण करून आणि आशीर्वाद घेऊन गुलाल-भंडारा उधळला जात होता. त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिशबाजीही सुरू होती. दुर्दैवाने, हवेत उधळल्या जाणाऱ्या कोरड्या भंडाऱ्याचा संपर्क तिथे वाजत असलेल्या फटाक्यांच्या ठिणग्यांशी आला. सूक्ष्म कणांमुळे भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात आगीचा भडका उडाला. या अनपेक्षित आगीमुळे तिथे उपस्थित असलेले काही जण भाजले गेले आहेत. या घटनेमुळे जल्लोषाच्या वातावरणात एकच खळबळ उडाली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने, जीवितहानी टळली असली तरी या घटनेने उत्सवाच्या वेळी फटाके वाजवताना घ्यावयाच्या काळजीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भंडाऱ्याच्या भडक्यात १६ जण होरपळले
विजयाचा जल्लोष सुरू असताना गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडाऱ्याचा मोठा भडका उडाला. या भीषण आगीत सुमारे १६ जण गंभीररीत्या भाजले असून, यामध्ये आत्ताच विजयी झालेल्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल दुपारी घडली घटनेत भाजलेल्या जखमींना खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी समर्थकांसह खंडोबा गडाच्या पायथ्याशी धाव घेतली. तिथे देवाच्या नावाने 'यळकोट यळकोट'चा जयघोष करत भंडारा उधळला जात होता आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जात होते. फटाक्यांच्या ठिणग्या हवेत उधळलेल्या भंडाऱ्याच्या संपर्कात आल्या आणि क्षणार्धात आगीचा मोठा गोळा तयार झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या १६ जणांना तातडीने स्थानिक सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीच या अपघातात जखमी झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जेजुरीत विक्री होणाऱ्या भंडाऱ्याच्या शुद्धतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नाही, तर ते समाजाचे एक ...
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये आताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांचा तसेच प्रभाग क्र.५ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु.स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला व स्फोटही झाला या मध्ये सुमारे १६ जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.
जखमींची नावे
१)रुपाली खोमणे २)विलास बारभाई , ३)सानिका गाढवे , ४) संस्कार गलांगे , ५)देवल बारभाई , ६)मनीषा चव्हाण ,७)रजनी बारभाई , ८)स्वप्नील लाखे , ९)अनिल बारभाई , १०)गणेश चव्हाण ११)निशा दादा भालेराव १२)लक्ष्मी माऊली खोमणे १३) मोनिका राहुल घाडगे ( नवनिर्वाचित नगरसेविका )१४)राहुल कृष्णा घाडगे ,१५ )कु.स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका ) १६)उमेश भंडलकर