बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जमावाने बीएनपी नेत्याच्या घरावर हल्ला करून आग लावल्याने सात वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास भाबनिगंज युनियन बीएनपीचे संघटन सचिव आणि व्यावसायिक बेलाल हुसेन यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. हल्लेखोरांनी घराच्या दोन्ही दारांना बाहेरून कडी लावून पेट्रोल ओतत घराला आग लावली. काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले.


या आगीत बेलाल हुसेन यांची सात वर्षांची मुलगी आयेशा हुसेन हिचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन मुली सलमा आफ्तर आणि सामिया आफ्तर यांच्यासह बेलाल हुसेन हे गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेबाबत माहिती देताना बेलाल हुसेन यांच्या आई हाजेरा बेगम यांनी सांगितले की, जेवणानंतर कुटुंब झोपले होते. रात्री अचानक आग लागल्याचे लक्षात येताच बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही दारे बाहेरून बंद होती. बेलाल हुसेन यांनी कसेबसे दार तोडून कुटुंबाला बाहेर काढले. त्यांची पत्नी चार महिन्यांच्या बाळासह आणि सहा वर्षांच्या मुलासह बाहेर पडली, मात्र तीन मुली खोलीत अडकून पडल्या. दोन मुलींना गंभीर अवस्थेत बाहेर काढले , मात्र आयेशाचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment

इराणमधील आंदोलनांमध्ये ३ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी

तेहरानत्र : इराणमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची

मोदींप्रती मला आदर; ते माझे जवळचे मित्र!

दावोसमधील आर्थिक परिषदेत ट्रम्प यांच्यांकडून कौतुकाचा वर्षाव दावोस: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

Pakistan Karachi Massive Fire : पाकिस्तानमध्ये अग्नितांडव! अख्खी इमारत जळून खाक, तब्बल 'इतक्या' जणांचा होरपळून मृत्यू

कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात एका बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देश

भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक दावोस : “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका