अंधेरी : मुंबईतील अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथील रमाबाई नगर परिसरात पहाटे गॅस लीकमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. रमाबाई नगरमधील झोपडपट्टी परिसरातील एका घरात रात्रीपासून एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती सुरू होती. घरातील सदस्य झोपेत असताना गॅस संपूर्ण घरात पसरला होता. पहाटे उठल्यानंतर लाईट सुरू करताच ठिणगी पडली आणि अचानक जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर घराला आग लागली आणि आगीच्या झळांमध्ये तिघे जण गंभीररीत्या होरपळले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंधेरीतील रमाबाई नगरमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट , लाईट सुरू करताच ठिणगी पेटली
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.