मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार - मराठी संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळ सभागृहात आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विश्वकोश निर्मिती, साहित्य संमेलनांचे आयोजन आणि शासकीय व्यवहारात मराठीचा वाढता वापर यांसारख्या ठोस धोरणात्मक पावलांचा त्यांनी उल्लेख केला.


महाराष्ट्र विधानमंडळात झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आशुतोष काळे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन केदार शिंदे, ऋषिकेश जोशी, प्रभू देसाई, धनश्री दामले आणि त्यांच्या टीमने केले.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा वाहून नेणारी पवित्र धारा आहे. “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन केले तसेच संत, कवी, लेखक, अभ्यासक, शिक्षक आणि संशोधक यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. मराठी ही महाराष्ट्राच्या नसा-नसांतून वाहणारी अस्मिता असल्याचे त्यांनी नमूद केले.


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने पाठपुरावा केला, याची आठवण करून देताना शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून मातृभाषेत शिक्षण आणि अभ्यास यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


मराठी ही व्यवहाराची भाषा म्हणून सर्व क्षेत्रांत प्रभावीपणे वापरली जावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचे इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावेत, मराठीचा वापर प्रशासनात वाढावा आणि ती अर्थार्जनाची भाषा व्हावी, यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून यशाचा महासागर तयार होतो, तसेच मराठीचा महासागर उभा करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


तंत्रज्ञानाच्या युगात मराठीने कालसुसंगत बदल आत्मसात केले असून सोशल मीडियावरही मराठीची विविध रूपे दिसत आहेत. बोलीभाषांचे वैविध्य ही मराठीची ताकद असल्याचे सांगत खानदेशी, मालवणी, कोकणी, वऱ्हाडी आदी बोलीभाषांचा त्यांनी उल्लेख केला. उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करून मराठीची कीर्ती वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.


शासनाच्यावतीने विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करणे, बालकोश, कुमार कोश, ऑलिंपिक कोश निर्मिती तसेच विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य या संमेलनातून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


विधानमंडळ अधिवेशनाच्या धावपळीत आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या कार्यक्रमातून मराठी विनोदाची परंपरा उजागर झाल्याचे सांगत शिंदे यांनी आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी शैलींचा उल्लेख केला. संकटातही विनोद शोधणारा मराठी माणूस हीच आपली ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.


“माझ्या रक्तात मराठी, माझ्या श्वासात मराठी,” असे भावनिक उद्गार काढत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनी माय मराठीचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या