उद्या मतमोजणी
मुंबई : राज्यातील १६ जिल्ह्यांमधील २४ नगर परिषदांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुका अशा नगरपालिका व नगर परिषदांमध्ये होत आहेत, जिथे अध्यक्ष, सदस्य किंवा काही ठिकाणी फक्त सदस्यांच्या निवडणुका न्यायालयीन कारणांमुळे यापूर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
या सर्व ठिकाणी २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या ठिकाणी २० डिसेंबर रोजी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.या निवडणुकीत अंबरनाथ, कोपरगाव, बारामती, अक्कलकोट, महाबळेश्वर, फुलंब्री, मुखेड, निलंगा, अंजनगाव सुर्जी, वसमत, बाळापूर, यवतमाळ, वाशीम, देऊळगाव राजा, देवळी, रत्नागिरी व गुऱ्हाळ या नगरपरिषदांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगर परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. काही ठिकाणी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक वेळ न देता निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली. हे नियमांविरुद्ध असल्याचे लक्षात घेऊन आयोगाने त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित केली.
२४ नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षपदासह सर्व सदस्य पदांसाठी व ७६ नगरपालिका, नगरपंचायतींमधील १५४ सदस्य पदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ डिसेंबर रोजी सर्व ठिकाणी मतमोजणी होईल.