BJP News : भाजपचा उबाठासह शरद पवारांना पुन्हा दणका! माजी आमदार सुरेश भोईर, संजोग वाघेरेंच्या हाती कमळ

शरद पवारांच्या आमदराचा मुलगा भाजपमध्ये दाखल


मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच, भाजपने विरोधी पक्षांचे बुरुज उद्ध्वस्थ करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच मुंबईतील महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश झाल्यानंतर, भाजपने कल्याण-डोंबिवलीसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडकडे आपला मोर्चा वळवला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी उबाठा गटाचे माजी आमदार सुरेश भोईर, मावळ मतदारसंघातील महत्त्वाचा चेहरा असलेले संजोग वाघेरे पाटील आणि शरद पवार गटाचे वडगावशेरीचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.



नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी सुभाष भोईर यांच्यासोबत माजी नगरसेवक रवींद्र पाटील, माजी जि.प. सदस्य सुखदेव पाटील, सुरज जाधव, अभिषेक ठाकूर, विश्वनाथ पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे, माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, विकास दांगट, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, कणव चव्हाण (वसंतराव चव्हाणांचे पुत्र), खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे यांनी कमळ हाती घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनुषंगानेही भाजपला मोठे बळ मिळाले. संजोग वाघेरे पाटील यांच्यासह उषा वाघेरे, प्रशांत शितोळे, विनोद नडे, प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, नवनाथ जगताप, अमित गावडे या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.



ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपची ताकद वाढली


कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रवेशाने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. भोईर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजेश मोरे यांनी भोईर यांचा पराभव केला होता. सुभाष भोईर हे ठाणे महापालिकेचे पाच वेळा नगरसेवक, तसेच कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेतून आमदारकी जिंकलेल्या भोईर यांना २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती.



पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का


दुसरीकडे, उबाठा गटाकडून मावळ लोकसभा निवडणूक लढवलेले संजोग वाघेरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. उबाठा गटाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी वाघेरे यांच्यावर सोपवली होती. अजित पवारांचे निष्ठावंत मानले जाणारे वाघेरे लोकसभा निवडणुकीपूर्वी उबाठात दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीपासूनच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा होत्या. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपची वाट धरली आहे.



शरद पवारांना धक्का


२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आणि अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता. मात्र, अवघ्या दीड वर्षांत त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांची भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेंद्र हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील 'यंग ब्रिगेड'चे सदस्य म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महापालिका निवडणुकीत भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला ६ तासांत अटक

मालाड : मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

विक्रोळीत उबाठाचे खाते रिकामेच राहणार?

िचत्र पालिकेचे : विक्रोळी िवधानसभा सचिन धानजी मुंबई : विक्रोळी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून येत उबाठा

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेवर येत्या रविवारी २१ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात

Nagpur News : नागपूर हादरले! बुटीबोरी एमआयडीसीत भीषण दुर्घटना, ६ कामगारांचा मृत्यू

मृतांच्या वारसांना ३५ लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी

रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या