सातारा अमली पदार्थ प्रकरणात शिंदे कुटुंबीयांचा सहभाग नाही

विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्वाळा


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सातारा अमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सातारा अमली पदार्थ प्रकरणात शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिंदे यांच्यावरील आरोप फेटाळून लावत त्यांची पाठराखण केली.


महापालिका निवडणुकांमधील जागावाटपाची चर्चा व एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्याच्या घटनेमुळे ताणलेल्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखण केली. कसल्याही प्रकारचा संबंध नसताना विरोधकांनी आरोप करणे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.  उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.


बिबट्या पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढविणार :


राज्यात बिबट्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अधिवासातून बाहेर येऊन मानवी वस्तीतील हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांच्या पुनर्वसन केंद्रांची युद्ध पातळीवर निर्मिती केली जात आहे. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यांना पकडून त्यांना केंद्रात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

उद्धव - राजच्या शिवाजी पार्कमधील सभेआधीच उबाठाला मोठा धक्का

मुंबई : उद्धव आणि राज यांची रविवारी शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा होणार आहे. ही सभा होण्याआधीच उबाठाला मोठा

काँग्रेसचा 'लाडकी बहीण' द्वेषाचा क्रूर चेहरा उघड!

मुंबई : "महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनात ठासून भरला आहे. आमच्या माता-भगिनींच्या

'ठाकरेंचा बालेकिल्ला ? याच भागातून आमचे उमेदवार तीन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी'

मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे

उद्धव सरकारच्या काळात काय घडलं ? फडणवीस - शिंदेंना अटक करण्याचा कट कसा शिजला ?

मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता असताना एक धक्कादायक प्रकार घडल्याचं

मुंबईतील १४४ माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात

भाजपाने दिली सर्वाधिक माजी नगरसेवकांना संधी मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात तब्बल १७००

शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात धक्का ; ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला