माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार?

मुंबई (प्रतिनिधी): जामीन मंजूर झाल्यामुळे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची अटक टळली मात्र त्यांच्या आमदारकीवर अजूनही टांगती तलवार कायम आहे. आता आमदारकी वाचवण्यासाठी कोकाटे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.


बनावट कागदपत्रांच्या आधारे चार सरकारी सदनिका लाटल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले कोकाटे यांना या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.


माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने त्यांच्या आमदारकीवरील संकट कायम आहे. नियमानुसार दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीचे पद धोक्यात येते. उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, कोकाटे उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणार आहेत.

Comments
Add Comment

मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेगा भरती

४४० नवी पदनिर्मिती; निरस्त पदांवरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य कणकवली : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

शाळांच्या नावातील ग्लोबल, इंटरनॅशनल शब्दांना बंदी

शिक्षण संचालनालयाचे निर्देश मुंबई : राज्य मंडळाच्या अखत्यारितील शाळा प्रशासन शाळांच्या नावांमध्ये ‘ग्लोबल,

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते