विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल

लंडन : हजारो कोटींचं कर्ज थकवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या आणि काही गंभीर आरोपांनंतर भारताबाहेर गेलेला आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी हे दोघे भारतीय सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. तिथे विजय माल्या याच्या काही दिवसांनी असलेल्या वाढदिवसानिमित्त ललित मोदी याने एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. तसेच या पार्टीमध्ये विजय माल्या आणि ललित मोदी एकत्र आलेले दिसले. एवढंच नाही तर या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.


विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने ही पार्टी बेलग्रेव स्क्वेअर येथील आपल्या आलिशान निवासस्थानी आयोजित केली होती. या पार्टीला बायोकॉनचे संस्थापक किरण मजुमदार-शॉ, अभिनेता इदरीस एल्बा आणि फॅशन डिझायनर मनोविराज खोसला हे उपस्थित होते. प्रसिद्ध फोटोग्राफर जिम रायडेल याने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ललित मोदीनेही या पार्टीचे फोटो शेअर करत या पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्याचे आभार मानले. तसेच विजय माल्याचा उल्लेख आपला मित्र असा करत त्याचं खूप कौतुक केलं. या पार्टीचं निमंत्रण पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यात विजय माल्या याला ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असे म्हटले आहे. मात्र या जंगी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून ललित मोदी आणि विजय माल्या यांना नेटिझन्सकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच लंडनमध्ये मौजमस्ती करत असलेल्या या दोघाही पळपुट्यांना सोशल मीडियावर झोडून काढण्यात येत आहे.

Comments
Add Comment

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी शनिवारी मतदान

मुंबई : राज्यातील २३  नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी, तसेच विविध नगरपरिषदा व

माणिकराव कोकाटे यांची तात्पुरती अटक टळली, मात्र आमदारकीवर टांगती तलवार! कोर्टाच्या निर्णयात काय म्हंटलय?

नाशिक : सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार

विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय

जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय नाही, सिंगापूर पोलिसांचा खुलासा

सिंगापूर : भारतीय नागरिक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत सिंगापूर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत. या

राज्यातील २९ महानगरपालिकेतील समन्वयक, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक पार ;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती...

विदर्भ, मराठवाडा, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, ठाणे विभागातील पदाधिकारी उपस्थित... राष्ट्रवादी काँग्रेस आणि

भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"ऋषभायन-2" वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव व 'वृषभ कला' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते