कर्जत - पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू होणार

३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचे काम पूर्ण


राहुल देशमुख


कर्जत : कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहेत. या मार्गिकेसाठीचा ३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचं काम पूर्ण झालं असून, यामुळे मार्गिकेसाठीचा मोठा टप्पा पार पडला आहे.


मागील कित्येक वर्षांपासून कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे. अखेर आता कर्जत-पनवेल मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा लवकरच पूर्ण होणार आहे. कर्जत - पनवेल या मार्गिकेसाठी डोंगर फोडून एक बोगदा उभारण्यात आला आहे. कित्येक दिवस या मार्गाचं काम सुरू होतं. आता किरवली-वांजळे गावाजवळील ३०० मीटर लांबीचा हा नवा बोगदा आता पूर्ण झाला आहे. या बोगद्यात आता रूळ टाकण्याचं काम बाकी आहे. बोगद्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने या मार्गावरील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.


२००५ मध्ये बांधलेला जुना हलीवली बोगदा ठिसूळ असल्याने दगड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे हा मार्ग रेल्वे, लोकलसाठी सुरक्षित नव्हता. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल-कर्जत दरम्यान नवीन आणि सुरक्षित मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. यातून चौक ते कर्जत हा पूर्णपणे नवा मार्ग आणि पनवेल ते चौक हा जुना मार्ग वापरून हा प्रकल्प तयार केला जात आहे.


या नव्या मार्गावर कर्जत तालुक्यात किरवली आणि वांजळे गावांच्या हद्दीत एक मोठा बोगदा बांधण्यात आला आहे. हा बोगदा दुहेरी मार्गांसाठी पुरेशी जागा ठेवून बांधला आहे. या बोगद्याचं बांधकाम भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन करण्यात आलं आहे. तशीच त्याची रचना केली आहे. बोगद्याचं एक टोक किरवली गावात, तर दुसरं टोक वांजळे गावात आहे. या बोगद्यानंतर कर्जत-कल्याण राज्यमार्ग लागतो, ज्यावर आधीच उड्डाण पूल तयार आहे.


त्यामुळे या नव्या रेल्वे मार्गामुळे रस्ते वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही. बोगद्याचं बांधकाम पूर्ण झालं असून मार्गिका तयार असल्याने कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग आता उपनगरीय सेवेसाठी सज्ज झाली आहे. बोगद्याची संरचनात्मक कामं पूर्ण झाली असून ही मार्गिका तयार असल्याने कर्जत–पनवेल रेल्वे मार्ग लोकल सेवेसाठी तयार
झाला आहे.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

घोणसरी येथे मादी बिबट्याला पकडून सोडले अधिवासात

कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर येथे बिबट असल्याचे नागरिकांनी कळवले.

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्र मार्गे अमेरिकेसाठी रवाना - पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन

बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी