शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र शोककळा पसरली असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुतार यांना आदरांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडीयावर टाकली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सांत्वना दिली.





पुढे त्यांनी लिहिले आहे, रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला. अत्यंत बारकाईने केलेली कलाकुसर आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय होते. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो.



अनेक शिल्पांना त्यांनी आकार दिला.
स्टॅच्यु ऑफ यूनिटीमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किंवा अंदमानमधील वीर सावरकर यांचा पुतळा. वयाच्या १००व्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते. संसद भवन परिसरात सुद्धा त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे आहेत. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि ते प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल.



मी त्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशाप्रकारे फडणवीसांनी सुतारांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.


Comments
Add Comment

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या

धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच,

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण