जनता काँग्रेसची कबर खोदेल!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल


मुंबई : देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल, असा थेट प्रहार शिंदे यांनी काँग्रेसवर केला.


राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे थेट जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे. पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन ‘सिंदूर’अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ अचूकपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई अत्यंत प्रिसाईज असून कोणतेही नागरी नुकसान झाले नाही. या कारवाईमुळे भारताची लष्करी ताकद आणि राजकीय इच्छाशक्ती जगासमोर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे, असे शिंदे म्हणाले.


या संपूर्ण मोहिमेत लष्करी जवानांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे राहिले. ‘खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,’ हा संदेश मोदी सरकारने पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला दिला आहे. ही टीका देशप्रेमातून नाही, तर पाकिस्तान प्रेमातून होत आहे. काँग्रेस नेत्यांची विधाने पाकिस्तानमध्ये हेडलाईन बनत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. या शौर्यपूर्ण कारवाईनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये देशविघातक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

Comments
Add Comment

खेड - मंडणगड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खेड : खेड–मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा

KGF २ च्या असिस्टंट डायरेक्टरवर कोसळला दुःखाचा डोंगर; कीर्तन नादगौडांचा साडेचार वर्षीय मुलगा अपघातात दगावला

बंगळुरू : घरात लहान मूल असताना क्षणभराचे दुर्लक्षही किती मोठी किंमत मोजायला लावू शकते, याचा हृदयद्रावक अनुभव

नितीश कुमारांनी हिजाब ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल; महिलेने २४ तासातच घेतला टोकाचा निर्णय

पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे सुरू झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. सरकारी

एसीएमई सोलारने ४७२५ कोटी रुपयांचे वित्तपुरवठा मिळवला

गुरूग्राम: एसीएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड (एसीएमई सोलार) या अक्षय उर्जा (Renewable Energy) आपल्या नव्या विस्तारासाठी व

मेस्सीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी एसआयटीकडे; अटकेची संख्या ६ वर

कोलकाता: अवघ्या फुटबॉल विश्वाला आपल्या कवेत घेऊन फिरणारा अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेसी

ठेकेदाराला हलगर्जीपणा नडला, रंगकाम करताना कोसळून मजूराचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले