शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला
- उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्प साकारली. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला.या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले.गेल्याच महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला होता.आणि अभिजात भाषा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला होता.त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला होता.




राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन दिल्लीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं. यातून त्यांची कामाप्रती निष्ठा दिसून येते.एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही ते प्रत्येकाशी आत्मीयतेने, आपुलकीने बोलत.साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांचे निधनाने भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे.त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Comments
Add Comment

Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील

Kolhapur Accident News: इनोव्हा-लॉरीची जोरदार धडक: दोघांचा जागीच मृत्यू DYSP वैष्णवी पाटील गंभीर...

कोल्हापूर : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) म्हणून कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या खासगी

निवडणुकीच्या रणधुमाळीत बडतर्फ IAS पूजाच्या घरात घडली धक्कादायक घटना, पोलीस तपास सुरू

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घरात रविवारी मध्यरा‍त्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ

साताऱ्यात आनंदावर शोकाची छाया; लेकीच्या जन्मावेळीच सैनिक पित्याचा अपघाती मृत्यू

सातारा : नियतीचा खेळ कधी किती निर्दयी ठरेल, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे.

CSMT स्टेशनवर विमानतळासारखी सुरक्षा; वाढत्या धमक्यांनंतर कडक निर्बंध,आता प्रवेश सहज नाही…

मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) मेल आणि एक्सप्रेस प्रवाशांसाठी बॅगेज तपासणी अनिवार्य

कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची