मेट्रो- ९, मेट्रो- २ बीचे निवडक टप्पे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणार

मुंबई : मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाइन २ बी या दोन नव्या मेट्रो मार्गांचे निवडक टप्पे ३१ डिसेंबरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही मार्गांच्या आंशिक उद्घाटनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.


दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो-९ ही विद्यमान मेट्रो लाइन ७ ची विस्तारित लाईन आहे. अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ मार्गकेची एकूण लांबी १३.५८ किमी आहे. दहिसर पूर्व आणि वेगाने विकसित होत असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातील दळणवळण अधिक मजबूत करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते काशीगावदरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार असून त्यामुळे उत्तर उपनगरांतील प्रवासाचा वेळ कमी होण्यासह वाहतूककोंडीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. लाइन ९ वरील नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांवर मेट्रो गाड्या उभ्या असल्याचे दृश्य समोर आल्याने या मार्गाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्थानके, ट्रॅक आणि रोलिंग स्टॉक मोठ्या प्रमाणावर तयार असून अंतिम सुरक्षा तपासणी व एकत्रीकरणाशी संबंधित परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबईभर मेट्रोचे जाळे विणले गेले असून काही सेवा सुरू झाल्या असून लाखो मुंबईकर मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. यामुळे उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी झाला आहे.


मेट्रो लाइन ९, मेट्रो लाइन २ बी हे नवे मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो लाईन ९ ही मेट्रो लाइन ७ शी अखंडपणे जोडली जाणार असून त्यामुळे अंधेरी (पूर्व) ते मीरा-भाईंदरदरम्यान अधिक सुलभ आणि वेगवान संपर्क उपलब्ध होईल. यामुळे आधीच ताणाखाली असलेल्या उपनगरी रेल्वे सेवांवरील तसेच मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. मेट्रो लाईन २ बीच्या काही टप्प्यांचेही समांतरपणे उद्घाटन होणे हे मुंबई मेट्रो जाळ्याच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे द्योतक आहे.

Comments
Add Comment

सिक्युरिटी व भांडवली बाजाराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच सिक्युरिटीज मार्केट कोड बिल संसदेत सादर

नवी दिल्ली: देशातील आणखी एक मोठे विधेयक संसदेने पारित केले आहे. भांडवली बाजारातील हे मोठे धोरणात्मक पाऊल असून

माजी मंत्री माणिकराव कोकाटेंवर होणार अँजिओग्राफी, सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई: बनावट कागदपत्रं दाखवून शासकीय कोट्यातली सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची

ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराचा दुरान्वयेही संबंध नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल

लंडन : हजारो कोटींचं कर्ज थकवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या आणि काही गंभीर आरोपांनंतर भारताबाहेर

पहिल्या सत्रात डॉ लाल पॅथलाब्स शेअर ५१% कोसळला पण....

मोहित सोमण:डॉ लाल पॅथलाब्स कंपनीचा शेअर आज ५१% इंट्राडे निचांकावर कोसळला आहे. त्यामुळे शेअर १३५९.१० रूपयांवर

Navnath Ban : "सामनाचे भाकीत म्हणजे गणपत वाण्याची माडी!" अमेरिकन फायलींवरून पंतप्रधान बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नवनाथ बन यांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : अमेरिकेतील गाजलेल्या 'एपस्टिन प्रकरणा'चा आधार घेत भारतातील पंतप्रधान बदलले जातील, अशा आशयाचा अग्रलेख