पुणे ते छत्रपती संभाजीनगर शहरांना जोडणारा आत्याधुनिक महामार्ग
पुणे : पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडण्यासाठी एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा नवीन एक्स्प्रेस हायवे आत्याधुनिक असणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर जळगाववरून पुण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. फक्त २ तासांत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करता येणार आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा हा आत्याधुनिक आणि चांगला महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. यामुळे पुणे ते जळगाव अंतरदेखील कमी होणार आहे. सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सहा ते साडेसहा तास लागतात. दरम्यान, या नवीन महामार्गामुळे तुम्ही फक्त २ तासांत हा प्रवास करू शकतात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी ३-४ तासांनी कमी होणार आहे, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
याचसोबत मुंबई-नागपूर या महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. सध्या जळगावरून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जावे लागते. त्यासाठी अडीच तास लागतात. दरम्यान, हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.
त्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा एक्स्प्रेस हायवे बांधण्यात येणार आहे. यामुळे हा कालावधी फक्त १ तासावर येणार आहे. जळगाव-छत्रपती संभाजी नगर असा १ तास प्रवास आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे दोन तास गृहीत धरले तर तुमचा प्रवास फक्त तीन तासांचा होणार आहे. जळगाववरुन पुण्याला फक्त ३ तासात पोहोचता येणार आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गासाठी १६ कोटी ३१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग आत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.