ग्राहकांना गुड न्यूज! आता क्रेडिट कार्ड व युपीआय एकाच वेळी? भारतात गुगल पे फ्लेक्स अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड लाँच

मोहित सोमण: फिनटेक तंत्रज्ञानात आता मोठ्या प्रमाणात क्रांती होत आहे. मोठ्या या संक्रमणाच्या काळात गुगलने अ‍ॅक्सिस बँकेशी भागीदारी करत 'रूपे' (RuPay) प्रणित 'गुगल पे फ्लेक्स अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ' हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. या नव्या युपीआयशी जोडलेल्या क्रेडिट कार्डाचा मोठ्या प्रमाणात लाभ तरूणांना, सर्वांनाच व जेनझी पीढीला होणार आहे. दैनंदिन जीवनात ईएमआय असेल,खरेदी असेल, इतर खर्च असतील, कर्ज असेल सगळ्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा घेणे आता सहज शक्य होणार आहे. या डिजिटल क्रेडिट कार्ड अंतर्गत अनेक वित्तीय सुविधा लाँच करण्यात आलेल्या आहेत.


दैनंदिन युपीआय (Unified Payment Interface UPI) वापरताना अनेकदा निधीची कमतरता अथवा काही कारणाने टंचाई भासते अशावेळी भौतिक क्रेडिट कार्ड सुविधेप्रमाणेच आता ग्राहक डिजिटल क्रेडिट कार्ड सुविधा गुगल पे अ‍ॅपमध्येच वापरता येणार आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 'रुपे नेटवर्कवर तयार केलेले, हे कार्ड लोक दररोज करत असलेल्या यूपीआय पेमेंट्सप्रमाणेच क्रेडिट अनुभव सर्वव्यापी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते जे गुगल पेच्या सोयीस्कर, सुरक्षित अनुभवाने आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या विश्वासार्ह बँकिंग कौशल्याने समर्थन प्राप्त केले आहे' असे म्हटले आहे.


त्यामुळे आता ग्राहक युपीआयमध्ये असलेल्या सुविधा क्रेडिट कार्डशी असलेल्या सुविधांशी एकत्रित करू शकणार आहेत. रूपे हे प्रथम सर्वात मोठे देशपातळीवर चालणारे कार्ड पेमेंट नेटवर्क समजले जाते. अनेकदा लहान मध्यम अथवा को ऑपरेटिव्ह बँका आपल्या ग्राहकांना 'रूपे' क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करतात. मास्टरमाईंड, विझा या जागतिक क्रेडिट कार्ड नेटवर्कला टक्कर देणारी मेड इन इंडिया प्रणाली ओळखली जाते. असे असल्याने या आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करणाऱ्या कंपन्यांना पर्याय म्हणून टिअर १ व टिअर २ शहरात मोठ्या प्रमाणात रूपे अधिक प्रमाणात वापरले जाते. आर्थिक समावेशनात (Financial Inclusion) पुढील टप्पा म्हणजे निमशहरी व ग्रामीण भागातही युपीआय व्यवहार होत असताना आर्थिक सुविधा वाढवण्यासाठी हे नवे कार्ड डिझाईन करण्यात आले आहे.


मास्टरकार्ड आणि व्हिसाच्या विपरीत, रुपे कार्ड्स यूपीआयशी लिंक केली जाऊ शकतात. ही कार्यक्षमता नवीन गुगल पे कार्डला विशेष बनवेल असा कयास मांडला जात आहे कारण ते यूपीआयच्या व्यापक स्विकारार्हतेचा क्रेडिट कार्डच्या फायद्यांशी जोडणे ग्राहकांना सोपे जाणार आहे.


या गुगल पे फ्लेक्स अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणखी काय फायदे आहेत?


१) पेमेंटमधील लवचिकता - तुम्ही एकाच वेळी अनेक मर्चंटला सहजपणे एका क्लिकवर थकीत देणी, अथवा पेमेंट सहज करू शकता. हे रूपे पेमेंट कार्ड क्रेडीट कार्ड इकोसिस्टीमशी संबंधित असल्याने ही डिजिटल पेमेंट सहज होतील.


२) रिवार्ड जिंका- या केलेल्या व्यवहारातून आता सहजपणे रिवार्डस पॉईंट्स ग्राहकांना प्रत्येक व्यवहारामागे मिळतील. महिन्याच्या शेवटापर्यंत वाट न पाहता यातून तुम्हाला पुढील व्यवहारासाठी ते पॉईंट्स वापरता येऊ शकतात. माहितीनुसार, १ स्टार पॉईंट्स म्हणजे १ रूपयाचा रिवार्ड असणार आहे.


३) पेमेंट सुविधा- तुम्ही क्रेडिट कार्डाची थकबाकीही युपीआयनेच भरू शकाल त्यासाठी भौतिक कार्ड स्वाईप करण्याची गरज भासणार नाही. एकाच गुगल पे अँपमध्ये सगळे काही व्यवहार व व्यवस्थापन शक्य होणार आहे.


४) पेबॅक फिचर- सर्वात महत्वाचे फिचर्स म्हणजे पेबॅक फिचर म्हणजे ग्राहकांना विविध पेमेंट विविध पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे ग्राहक त्यांची थकीत कर्ज अथवा देणी एक महिना, सहा महिने अशा विविध पद्धतीने आपले हप्ते (EMI) भरू शकणार आहेत.


गुगल पे अशा बाजारपेठेत प्रवेश करत आहे जिथे इतर कंपन्या आधीच सक्रिय आहेत. यापूर्वी भारतातील सर्वात मोठ्या युपीआय ॲप असलेल्या PhonePe ने आपला RuPay क्रेडिट कार्ड बाजारात आणण्यासाठी एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली होती.त्यानंतर त्यांनी व्हिसा आणि RuPay दोन्ही क्रेडिट कार्ड्स देण्यासाठी एसबीआय कार्ड्ससोबत भागीदारी केली.


या कार्ड शिवाय बाजारात Cred आणि Super.money यांसारख्या इतर पेमेंट ॲप्सद्वारे देखील युपीआय कनेक्टेड को-ब्रँडेड RuPay क्रेडिट कार्ड्स दिली जातात. गुगल पेकडे आधीच एस क्रेडिट कार्ड नावाचे दुसरे कार्ड उपलब्ध आहे जे व्हिसा नेटवर्कवरील अ‍ॅक्सिस बँकेच्या सहयोगाने बाजारात उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.