पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांचा राजीनामा

मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची घेतली जबाबदारी


कोलकाता : अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या ‘जीओएटी टूर’ कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्यानंतर, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याने अरूप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर अरूप विश्वास यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हाताने लिहिलेल्या पत्रात विश्वास यांनी म्हटले आहे की, या घटनेची ‘स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी’ सुनिश्चित करण्यासाठी ते पायउतार होत आहेत. मेस्सीचा भारत दौरा गोंधळात सुरू झाला. मेस्सी २० मिनिटांत तेथून निघून गेला. यानंतर १५ हजार रुपयांपर्यंत तिकीट घेतलेल्या संतप्त प्रेक्षकांनी मैदानात गोंधळ घातला.


Comments
Add Comment

ठाण्यात बिबट्यांची दहशत

येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्ला ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये

बंड शमले, अपक्ष वाढवणार ताप

ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानात ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील

अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले

ठाण्यात ६४९ उमेदवार रिंगणात, ७ बिनविरोध ठाणे : अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, ऐनवेळी मिळालेले एबी फॉर्म,

मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीसाठी भाजपचे १३ उच्चशिक्षित युवा

डॉक्टर, यांचा समावेश भाईंदर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना संधी देण्याबाबत दिलेल्या

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने