बंगळूरु : नवी दिल्लीहून बेळगावला येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला सुमारे चार तासांचा विलंब झाल्याने २१ मंत्री, आमदार व इतर लोकप्रतिनिधींना गैरसोयीला सामोरे जावे लागले. दिल्लीहून जाणारे विमान मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता बेळगावच्या सांबरा विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. हे विमान चार तास उशिरा दुपारी १२.१५ वाजता दाखल झाले.
शहरात आयोजित ‘मत चोरी’ विषयावरील परिषदेसाठी मंत्री व काँग्रेस आमदार दिल्लीला आले होते. त्यानंतर दावणगेरे येथे होणाऱ्या काँग्रेस नेते शमनूर शिवशंकरप्पा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी इंडिगोच्या विमानाने ते प्रवास करणार होते. आमदार पहाटे ४ वाजल्यापासून विमानात बसूनही दाट धूर व धुक्यामुळे विमानाने उड्डाण घेतले नाही. प्रतिकूल हवामानामुळे टेक-ऑफ व लँडिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.