Gold Silver Price : आनंदवार्ता! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

- गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी


मुंबई : आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच गुरुवार १९ मार्च रोजी, इराणशी संबंधित तणावामुळे शेअर बाजारात घसरण झाली आणि सेन्सेक्स सुमारे १८०० अंकांनी कोसळला. मात्र, सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुरुवारीची बाजार परिस्थिती दिलासादायक ठरली आहे.



सोन्याच्या दरात ४ हजार, चांदीत १४ हजारांची घसरण :


त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. मुंबईत सोन्याचे दर आज १,५६,१८६ रुपये प्रति तोळा, जे काल १,६०,१९० रुपये होते. म्हणजेच, सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरात जवळपास १४ हजार रुपयांची घसरण दिसली आहे. आज मुंबईत चांदीचा दर २,४३,९१३ रुपये प्रति किलो, तर काल तो २,५७,६६७ रुपये होता.



आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण :


'यूएस स्पॉट गोल्ड' १.२२% नी घसरून ४,८३६ डॉलर प्रति औंस


'स्पॉट सिल्वर' २.२५% नी घसरून ७५.७५ डॉलर प्रति औंस


देशांतर्गत वायदा बाजारात (MCX) सोन्याचा दर सुमारे १.५५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम, आणि चांदीचा दर २.५० लाख रुपये प्रति किलो झाला आहे.



सोने-चांदीचे दर कसे ठरतात?


आंतरराष्ट्रीय बाजार आणि डॉलर : जागतिक बाजारात सोने-चांदीचे दर डॉलरमध्ये ठरतात. डॉलर मजबूत किंवा रुपया कमकुवत झाला, तर भारतात किमती वाढतात.


कर आणि आयात शुल्क : आयात कर, जीएसटी आणि स्थानिक शुल्क देखील किमतींवर परिणाम करतात.


जागतिक अनिश्चितता : युद्ध, आर्थिक मंदी, व्याजदरातील बदल यांचा थेट परिणाम. अनिश्चिततेत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणजे सोने पसंती करतात.


सांस्कृतिक महत्त्व : भारतात सोने परंपरांशी जोडलेले आहे; सण, लग्नकार्य यांमुळे मागणी वाढते.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक