विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार


मुंबई : शाळेतील मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर आता कठोर केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत कठोर नियमावली लागू केली असून, शाळेतील प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट केली आहे.


शाळेत शिकणाऱ्या मुलांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. हे नियम केंद्र सरकारच्या २०२१ च्या 'शाळा सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक सूचनां'वर आधारित आहेत. त्यात शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शाळेत मुलांना कोणत्याही प्रकारची मारहाण (उदा. हाताने मारणे, काठीने फटके मारणे, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे) किंवा वाईट बोलणे, अपमान करणे, मानसिक छळ किंवा भेदभाव करता येणार नाही.



दोन दिवसांच्या आत अहवाल पाठवणे बंधनकारक


- कोणतीही अनुचित घटना घडली तर मुख्याध्यापकांना ताबडतोब ती नोंद करावी लागेल आणि दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा लागेल. याशिवाय घटनेशी संबंधित सर्व पुरावे, जसे की मुलांची हजेरी, अर्ज, वैद्यकीय रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी नीट जपून ठेवावे लागतील.

- जर घटना गंभीर असेल, विशेषतः लैंगिक छळाशी संबंधित, तर पोक्सो कायद्याने आणि बाल न्याय कायद्याने २४ तासांच्या आत पोलिसांत तक्रार करणे अनिवार्य आहे.





शिस्तभंगाची कारवाई होणार


हे नियम योग्य रीतीने पाळले जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि मुख्याध्यापकांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर कोणी घटना लपवली, पुरावे नष्ट केले किंवा खोटी माहिती दिली, तर त्या व्यक्तीवर शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल. एखादे वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर बातमी आली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ढिलाई खपवली जाणार नाही. सर्व शाळांना हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील आणि त्याची अंमलबजावणी नीट होईल यासाठी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील