जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील विद्यमान अग्निशमन प्रणाली ही जुनी झाली असून याचा योग्यप्रकारे वापर होत नसल्याने आता या इमारतीमध्ये धुर शोध प्रणालीअस्तित्वात नाही.. त्यामुळे या रुग्णालयात आता नव्याने अग्निशमन दलाच्यावतीने यंत्रणा बसवण्याात येणार आहे.



जोगेश्वरी (पूर्व) हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रुग्णालयांपैकी एक रुग्णालय असलेल्या या रुग्णालयात एमआयसीयु, एसआयसीयु, एनआयसीयु, एमआरआय आणि सिटी स्कॅन आदी सुविधा उपलब्ध आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात मुंबई अग्निशमन विभागाच्या वतीनेअग्नि लेखापरिक्षण केले होते. त्यांच्या अहवालानुसार कार्यालयातील यांत्रिक व विद्युत विभागाच्या अभियंत्याने रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाची पाहणी केली.. मुंबई अग्निशमन विभागाच्या अग्नि लेखापरिक्षण अहवालानुसार रुग्णालयात अग्निशामक हायड्रेट, स्प्रिंकलर, फायर अलार्म प्रणाली, फायर पंप इत्यादींची तातडीने स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली होती. विद्यमान अग्निशमन प्रणाली सन २०१० मध्ये बसविण्यात आली होती, त्यामुळे ती सद्यःस्थितीत जीर्णावस्थेत आहे. तसेच ती सुरळीतपणे कार्यरत ही नाही.




रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार , अग्निशमन प्रणाली जुनी असल्याने तसेच धूर शोषक प्रणाली नसल्याने महापालिकेने ही प्रणाली रुग्णालयात बसवणे आवश्यक बनले आहे. तसेच फायर अलार्म प्रणाली सह सार्वजनिक घोषणा प्रणालीही जुनी झाली आहे. त्यामुळे विविध कारणांमळे आगीच्या घटना वाढत त्यामुळे अग्निसुरक्षेच्या जागरुकतेसोबतच योग्य ती प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे टॉमा केअर रुग्णालयामध्ये आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन अप्रिय घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पूर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. . आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितरित्या बाहेर पडण्याकरिता स्वयं चमकणारे चिन्ह फलक बसवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने आता नवीन अग्निशमन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सव्वा चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या