'संजय राऊतांनी आधी आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे आणि मग उबाठाची वाट लावावी'; मंत्री संजय शिरसाटांचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे. आज (मंगळवारी) दुपारी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार असून, यासाठी आपण स्वतः भाजप कार्यालयात जाणार असल्याचे राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.



महायुतीचा 'विनिंग फॉर्म्युला'


युतीच्या बैठकीबाबत माहिती देताना शिरसाट म्हणाले की, "आज भाजप कार्यालयात संयुक्त बैठक होणार आहे. महायुतीला मिळालेल्या मताचा अनादर होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अहंकाराचा प्रश्न न करता पहिल्या फेरीच्या बोलणीसाठी मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार आहे." यावेळी त्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील स्पष्ट केला. "ज्या जागा ज्या पक्षांनी जिंकल्या, त्या जागा त्यांना मिळतील. ज्या मतदारसंघात ज्यांचा आमदार आहे, त्यांना झुकते माप दिले पाहिजे, असा आमचा फॉर्म्युला आहे. शिवसेना युतीत जास्त जागा लढवणार असून, गेल्या निवडणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो," असे त्यांनी नमूद केले.



'संजय राऊतांनी आधी तब्येत जपावी'


खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट यांनी अत्यंत खोचक शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, "संजय राऊत जोपर्यंत निगेटिव्ह बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांना जेवण जात नाही. त्यांनी आधी आपल्या आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे, तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग उरल्यासुरल्या 'उबाठा'ची वाट लावावी. अमित शाहांचे काय करायचे ते आमचा पक्ष बघेल."



मुंबई महापालिका आणि मराठी माणूस


मुंबईतील 'ठाकरे ब्रँड' आणि पोस्टर्सवर बोलताना शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणाऱ्यांनी मराठी माणसासाठी बोलू नये. तुम्ही बिल्डरच्या नादी लागून मराठी माणसाला बेघर केले. मुंबईला 'खड्ड्यांचे शहर' बनवले. महापालिका म्हणजे तुम्ही व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधन म्हणून पाहता का?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, महायुती पुन्हा मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



विरोधकांवर चौफेर फटकेबाजी


* रोहित पवार: "हे सर्व विद्वान आहेत. पण निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार म्हणजे आचारसंहिता लागणार, हे शेंबड्या पोरालाही कळते," अशा शब्दांत शिरसाटांनी रोहित पवारांची खिल्ली उडवली.
* सुप्रिया सुळे: सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम (EVM) घोटाळा नाही हे मान्य केले, हे एक परिवर्तनच आहे, असे शिरसाट म्हणाले.
* महाविकास आघाडी: काँग्रेसने 'उबाठा' सोबत न जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुंबईत झालीच तर मनसे आणि उबाठा यांची युती होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कुठे जातील, हे सांगता येत नाही, असे भाकीत त्यांनी वर्तवले.



पुणे-चिंचवडमध्ये युती नाही?


पुणे आणि चिंचवडमध्ये युती होणार नाही, हे जाहीर असल्याचे सांगत, अजित पवार काय करत आहेत याची आपल्याला कल्पना नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावर भाकरी फिरवण्याचा किंवा निर्णय घेण्याचा सर्वाधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

२९ महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार! - नवनाथ बन; मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या

मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार

नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणार मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी