मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा


मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन बिघडते. अनेक प्रवासी कामाच्या ठिकाणी विलंबाने पोहोचल्याने त्यांच्या वेतनातून पगार कपात होण्याच्या घटना घडतात. तसेच अनेक रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे त्रासास तोंड द्यावे लागते. रेल्वेच्या अशा कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल करण्यास सुरुवात केली आहे.


मध्य रेल्वेवरील लोकल रोजच उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दररोज विलंबाने लोकल धावत असल्याने लोकलमधील गर्दी वाढते, पुढील प्रवासाच्या वेळा चुकतात. लोकल रखडल्याने किंवा उशीरा धावल्याने काही प्रवाशांच्या बाहेरगावच्या गाड्या, विमाने चुकल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रवासी वेळेत फलाटावर पोहोचून देखील विलंबाने धावत असलेल्या लोकलने प्रवास करावा लागतो. तसेच प्रवाशांना विलंबाबद्दल, लोकल रद्द झाल्याबाबत, लोकल बिघाडाबाबत अनेकदा माहितीही दिली जात नसल्याने प्रवाशांची परवड होते.


मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकलच्या ढासळणाऱया वक्तशीरपणाकडे लक्ष द्यावे. विलंबाच्या वेळी वेळेवर आणि स्पष्ट घोषणा कराव्यात. बिघाडाच्या घटना कमी होण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ई-मेलद्वारे प्रवासी करत आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकासह इतर अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर प्रवासी तक्रारींचे मेल
करत आहेत.


मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक


एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळला. दर महिना सरासरी वक्तशीरपणा ९२ ते ९३ दरम्यान होता. परंतु, नोव्हेंबरमध्ये ९१.६८ टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ९३.३८ टक्के सरासरी वक्तशीरपणा होता. त्यातुलनेत यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये १.७ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या बेशिस्त कारभाराबाबत संताप व्यक्त करत आहेत.


Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी