मुंबई: एस अँड पी ग्लोबल मार्फत दर महिन्यात प्रकाशित केला जाणारा एचएसबीसी पीएमआय निर्देशांक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. एचएसबीसी पीएमआय निर्देशांक (HSBC Purchasing Manager Index) आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात महिन्याच्या आधारे खाजगी क्षेत्रात किंचित घसरण झाली आहे. गेल्या महिन्यातील ५९.७ तुलनेत डिसेंबर महिन्यात ५८.९ पातळीवर घसरण झाली आहे. तरीही अहवालातील माहितीनुसार, या महिन्यात सेवा क्षेत्रात किरकोळ घसरण झाली असली तरी खाजगी क्षेत्रात प्रभावी वाढ झाली आहे.
अहवालातील माहितीनुसार, सेवा क्षेत्रातील किरकोळ घसरण ही संथ गतीने स्थिर वाढ झाल्यामुळे झाली असली तरी आगामी काळासाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर बुकिंग वाढल्याने आगामी काळात आणखी वाढ अपेक्षित आहे. माहितीनुसार,ही ५९.७ पातळीवर झालेली वाढ फेब्रुवारी महिन्यापासून सर्वात कमी पातळीवर झालेली वाढ आहे. यापूर्वी एचएसबीसीने सेवा क्षेत्रासह उत्पादन (Manufacturing) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट केले होते. अहवालातील माहितीनुसार, सेवा क्षेत्रातील वाढ समाधानकारक असली तरी नोव्हेंबर महिन्यातील तुलनेत ऑर्डरमधील विविध कारणांमुळे संथ वेगाने वाढली. त्यामुळे ही वाढ ५८.९ पातळीवर मर्यादित राहीली आहे. अहवालातील मूल्यांकनानुसार, ५० पेक्षा अधिक पातळी ही अर्थव्यवस्थेतील व क्षेत्रीय वाढ समजली जाते तर ५० पेक्षा खाली पातळीवर व्यवस्था असल्यास ती चिंताजनक परिस्थिती म्हणून अधोरेखित होते. मात्र दोन्ही सेवा व उत्पादन क्षेत्रातील आकडेवारी ५० पेक्षा अधिक पातळीवर असल्याने अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत स्थितीत असल्याचे यातून स्पष्ट होते.
एचएसबीसी फ्लॅश इंडिया कंपोझिट आउटपुट इंडेक्सनुसार, २०२५ च्या शेवटच्या महिन्यात भारतीय खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक घडामोडींमध्ये वाढ सुरूच राहिली. त्याचवेळी मात्र मागील महिन्याच्या तुलनेत विस्ताराचा वेग मंदावला. नवीन ऑर्डर्समधील वाढ देखील वर्षाच्या अखेरीस कमी झाली, परंतु ती एका चांगल्या पातळीवर कायम राहिली.
या आकडेवारीनुसार,कंपन्यांनी डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात अपरिवर्तित ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे अहवालातील निरिक्षणानुसार या एक महिन्यात व्यवसायांनी मोठ्या संख्येने नवीन कामगारांची भरती केली नाही किंवा नोकऱ्यांमध्ये लक्षणीय कपात केली नाही. परंतु व्यावसायिक आत्मविश्वासही आणखी कमी झाला, ज्यामुळे कंपन्या भविष्याबद्दल थोड्या अधिक सावध होत असल्याचे दिसून येते. महागाईचा दबाव कमी राहिला हे व्यवसायांच्या खर्चातहि तीव्र वाढ न झाल्याने स्पष्ट होते असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
उत्पादन क्षेत्रातही वाढ मंदावण्याची चिन्हे दिसली. उत्पादन आणि नवीन ऑर्डर्स या दोन्हीमध्ये कमकुवत वाढ दिसून आली.यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एचएसबीसी पीएमआय निर्देशांक नोव्हेंबरमधील ५६.६ वरून डिसेंबरमध्ये ५५.७ पर्यंत घसरला होता. डिसेंबरमधील हा आकडा गेल्या दोन वर्षांतील उत्पादन क्षेत्राच्या वाढीत सर्वात लहान सुधारणा दर्शवते. २०२६ कडे पाहता एचएसबीसीने म्हटले आहे की कंपन्यांना विश्वास आहे की व्यवसायाची वाढ सुरू राहील. तथापि, आशावाद कमकुवत होत आहे. डिसेंबरमध्ये भावना सलग तिसऱ्या महिन्यात घसरल्या आहेत असे अहवालाने म्हटले डिसेंबरमध्ये भारताच्या व्यावसायिक वाढीचा वेग थोडा मंदावला असला तरी, अर्थव्यवस्था मजबूत वाढीच्या मार्गावर कायम आहे.