अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, आजपासूनच संबंधित क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला निकाल जाहीर केला जाईल.



प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मार्ग मोकळा


ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे या निवडणुका गेल्या ५ ते ७ वर्षांपासून प्रलंबित होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आणि राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिल्यानंतर आयोगाने वेगाने हालचाली केल्या आहेत. यापूर्वी २ डिसेंबरला नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, आता महानगरांचा नंबर लागला आहे.



निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये आणि नियम:


या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही यादी आल्याने त्यात नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण ३ कोटी ४८ लाख मतदार हक्क बजावतील. राज्यात ३९,१४७ केंद्रे असतील, त्यापैकी एकट्या मुंबईत १०,१११ केंद्रे असतील. यावेळी उमेदवारी अर्ज केवळ 'ऑफलाईन' (Offline) पद्धतीने स्वीकारले जातील. ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) नाही, त्यांना निवडून आल्यानंतर ६ महिन्यांत ते सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड असेल (मतदाराला १ मत), तर उर्वरित २८ महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती (१ ते ५ सदस्य) असल्याने मतदारांना त्यानुसार मतदान करावे लागेल.



निवडणूक आयोगाने दिलेली महत्त्वाची माहिती



  1. मतदारयाद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ नाही. जो काही थोडाफार घोळ होता, त्यात सुधारणा केली आहे. छापील मतदारयाद्या राजकीय पक्षांना आजच्या आज दिल्या जातील.

  2. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार तोफा थंडावणार

  3. दुबार मतदारांबाबत दोन दिवसांपूर्वी राजकीय पक्षांसोबत बैठक झालेली आहे. त्यात त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे.

  4. दुबार मतदार हे महानगरपालिका निहाय केवळ पाच टक्के ते वीस टक्के आढळून आले आहेत.

  5. मुंबईत सात टक्के दुबार मतदार आढळलेले आहेत.

  6. नागपूर महानगरपालिकेत पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही परिस्थितीत सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या पालिकांच्या निवडणुका देखील होतील. मात्र या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील.


महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक कसं असेल?



  1. मतदानाची तारीख - १५ जानेवारी

  2. मतदानाचा निकाल - १६ जानेवारी

  3. २७ महापालिकांची मुदत संपली आहे. यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

  4. एकूण मतदार - ३.४८ कोटी

  5. एकूण मतदार केंद्र - ३९,१४७

  6. मुंबईसाठी मतदार केंद्र - १०,१११

  7. कंट्रोल यूनिट - ११,३४९

  8. बॅलेट यूनिट - २२,०००




या ठिकाणी निवडणूक होणार


मुंबई विभाग


मुंबई
नवी मुंबई
ठाणे
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
भिवंडी
पनवेल
मीरा भाईंदर
उल्हासनगर
पश्चिम महाराष्ट्र


पुणे विभाग


पिंपरी-चिंचवड
कोल्हापूर
सांगली
सोलापूर
इचलकरंजी
उत्तर महाराष्ट्र


नाशिक विभाग


अहिल्यानंगर
धुळे
जळगाव
मालेगाव


मराठवाडा विभाग


लातूर
नांदेड-वाघाळा
परभणी
जालना
छत्रपती संभाजीनगर


विदर्भ


नागपूर
अकोला
अमरावती

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस

अधिवेशन संपताच भाजपचा उबाठाला दणका; तेजस्वी घोसाळकरांनी सोडली साथ

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच भाजपने उबाठाला दणका दिला आहे. मुंबईतील उबाठाच्या माजी