घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री म्हणाले, सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात फिडर मीटर आणि डिस्ट्रीब्युशन मीटर बसवण्यात आले असून, सध्या शासकीय कार्यालये व आस्थापनांमध्येच प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांसाठी मात्र पोस्टपेड स्मार्ट मीटरच बसवले जात आहेत.


स्मार्ट मीटर स्वीकारणाऱ्या ग्राहकांच्या वीजबिलात १० टक्के सवलत देण्यात आली असल्याने आतापर्यंत स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून तासागणिक वीज वापराचा तपशील मिळतो, त्यामुळे वापराची पडताळणी करणे सोपे झाले आहे. याशिवाय २४ तास तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध असून, आतापर्यंत पाच वेगवेगळ्या कंपन्यांनी बसवलेल्या स्मार्ट मीटरमध्ये केवळ एक टक्क्यांपेक्षा कमी त्रुटी आढळल्या आहेत. पुढील पाच वर्षे स्मार्ट मीटर पोस्टपेड स्वरूपातच राहणार असून, प्रीपेड मीटर सक्तीचा कोणताही निर्णय झालेला नाही. विधानसभा सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.


Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 'सहासूत्री' कार्यक्रम; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण नागपूर : राज्यात सुरू