सोन्याचा 'कहर' एक दिवसात सोने १४७० रूपये प्रति ग्रॅममागे वाढले १३५००० पातळी पार 'या' जागतिक संकेतामुळे आता पुढे काय? वाचा

मोहित सोमण:सलग दुसऱ्यांदा सोन्याने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. मोठ्या प्रमाणातील अस्थिरतेचा फटका सोन्यातील दबावात परावर्तित झाल्याने सोन्यातील रॅली आजही कायम राहिली आहे. एकाच सत्रात १ पातळीहून अधिक सोने उसळल्यने सोन्याचे दर २ महिन्यातील उच्चांकावर पोहोचले आहेत. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४७ रूपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३५ व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १११ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३५३८, २२ कॅरेटसाठी १२४१० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०१५४ रुपयांवर पोहोचले. तर प्रति तोळा किंमतीत २४ कॅरेटमागे १४७० रूपये, २२ कॅरेटमागे १३५० व १८ कॅरेटमागे १११० रूपये दर वाढले. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५३८०, २२ कॅरेटसाठी १२४१००, १८ कॅरेटसाठी १०१५४० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ एकाच सत्रात सोन्यात १% हून अधिक वाढ भारतीय कमोडिटी बाजारात (Mutli Commodity Exchange MCX) झाली आहे. संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३६५३, २२ कॅरेटसाठी १२५१५, १८ कॅरेटसाठी १०४४० रूपयांवर पोहोचले आहेत.


संध्याकाळपर्यंत भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोने निर्देशांकात १.१५% उसळले आहे. त्यामुळे दरपातळी १३५१५७ रूपयांवर व्यवहार करत आहे. जागतिक पातळीवर पाहिल्यास संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात १% वाढ झाली असून युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.८५% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४३३८.९२ औंसवर पोहोचली आहे. युएस भारत व्यापारी धोरणातील अद्याप अनिश्चितता, रूपयांची प्रति डॉलर ९०.७३ पातळीवर सुरु असलेली विक्रमी पातळी या कारणामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्यात सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे काही प्रमाणात डॉलर निर्देशांकात सातत्याने वाढ होत असताना सोन्याचे दर स्थिर होत होते. मात्र तुलनात्मकदृष्ट्या डॉलर निर्देशांकात किरकोळ घसरणीमुळे सोन्यावरील दबाव वाढला. याच कारणामुळे सोने आज आणखी महाग झाले आहे.


जागतिक बाजारात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिसने कपात झाली होती भारतातही आरबीआयने २५ बेसिसने कपात केल्याने व्याजदर आटोक्यात आले. फेड दर ३.५० ते ३.७५% पातळीवर व रेपो दर ५.५०% पातळीवर सुरु असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सातत्याने अस्थिरतेत काढून घेतली. या काढलेल्या गुंतवणूकीमुळे रूपयाची मागणी व महत्व कमी झाल्याने रूपया निचांकी पातळीवर घसरला. दरम्यान डॉलरच्या बास्केटमध्ये सातत्याने वाढ झाल्याने पुढील लक्ष गुंतवणूकदारांचे सोन्यासह रूपयावरही असणार आहे असे दिसते. विशेषतः युएस बाजारातील उद्या सीपीई व पेरोल रोजगार आकडेवारी जाहीर होणार असल्याने दिवसभरात सोने अस्थिर होते.


आता पुढे काय?


सोन्याच्या हालचालींवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याच्या किमती ४३६० डॉलरच्या पातळीकडे वाढल्याने सोन्याचे दर आणखी वाढले, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात मोठी तेजी दिसून आली. एमसीएक्समध्ये सोन्याने जागतिक तेजीचे प्रतिबिंब दाखवत सुमारे १७०० रूपयांची मोठी वाढ नोंदवली आणि १३५२५० च्या जवळ एक नवीन विक्रमी उच्चांक गाठला. सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढलेल्या मागणीमुळे आणि आगामी अमेरिकन आर्थिक आकडेवारीबद्दलच्या अपेक्षांमुळे ही वाढ झाली. या आठवड्यात नॉन-फार्म पेरोल्स आणि कोअर PCE (Personal Consumption Expenditure CPE) किंमत निर्देशांक जाहीर होणार असल्याने लक्ष आता अमेरिकेच्या मॅक्रो आर्थिक संकेतांवर केंद्रित झाले आहे, ज्यामुळे बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर आता १३३००० ते १३६४५०० या उच्च श्रेणीत व्यवहार करताना दिसत आहेत.'


यासह घसरलेल्या रूपयावरही भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे रुपयावर दबाव राहिल्याने, रुपया २८ पैशांनी कमकुवत होऊन ९०.७० वर पोहोचला. सोने आणि चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे आयात बिलावर आणखी परिणाम झाला असून, त्यामुळे रुपयाची कमजोरी वाढली आहे. नजीकच्या काळात रुपया ९०.०० ते ९१.२५ रुपयांच्या मर्यादेत व्यवहार करण्याची शक्यता आहे.'

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय