केईएम रुग्णालयात आता खिलाडूवृत्तीने होणार उपचार ; दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र , लवकरच स्वतंत्र क्रीडा विभाग करणार सुरु

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात आले आहे. केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध होणार आहेत. अशा स्वरूपातील सुविधा उपलब्ध करून देणारे शासकीय रुग्णालयांमधील केईएम हे मुंबईतील पहिले रुग्णालय ठरले आहे. क्रीडापटूंच्या उपचारासाठी आवश्यक असणारे आर्थोस्कोपी शल्यचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, बायोफिजिसिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशा स्वरूपाचे सर्व उपचार एकाच छत्राखाली उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे सध्या हे उपचार केंद्र सुरु केले असले तरी लवकरच याठिकाणी स्वतंत्र क्रीडा विभाग सुरु करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी नमूद केले.


क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयातील या केंद्राचे लोकार्पण मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते रविवारी १४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, अस्थिरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई, बाळकृष्ण इंडस्ट्रीच्या विजयालक्ष्मी पोद्दार, अरविंद पोद्दार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून क्रीडापटूंसाठी यास्वरूपाचे योगदान म्हणजे खासगी क्षेत्राची क्रीडा क्षेत्रासाठी असणारी वचनबद्धता आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीने केईएम रुग्णालयाची निवड करणे, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी म्हटले. खासगी क्षेत्राची क्रीडा क्षेत्रासाठी योगदान करण्याची तयारी ही अतिशय महत्वाची बाब आहे. मुंबईसारख्या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाट्यामुळे अतिशय गरजेची असणारी क्रीडापटूंसाठीची ही सुविधा निर्माण करणे शक्य झाले आहे. ज्याचा फायदा हा केईएम रुग्णालयाची देशपातळीवरील क्रमवारी उंचावण्यासाठीही निश्चितच होईल, असा विश्वासही गगराणी यांनी व्यक्त केला. क्रीडा क्षेत्राला उत्तमोत्तम उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्राचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. केईएम रुग्णालयात क्रीडा वैद्यकीय विभाग हा एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण क्षमतेने याठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी नमुद केले.


भारतात ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेची तयारी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशावेळी मुंबईसारख्या महानगरात क्रीडापटूंसाठी असे केंद्र उपलब्ध असणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. या केंद्रात उपचार घेऊन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंनाही सेवासुविधांचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही गगराणी यांनी व्यक्त केला. खेळताना अथवा व्यायाम करताना दुखापतग्रस्त झालो तर मलाही याठिकाणी उपचार घ्यायला आवडतील, अशी मिश्किल टिप्पणीही गगराणी यांनी याप्रसंगी केली.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये