दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष


दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय युवा संघाने त्यांच्या मोहिमेची सुरुवात धडाकेबाज शैलीत केली आहे. सलामीच्या सामन्यात यजमान यूएईचा मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर, रविवारी (आज) भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.


स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय युवा ब्रिगेडने यूएईचा तब्बल २३४ धावांनी एकतर्फी पराभव केला. भारताच्या या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. त्याने अवघ्या काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये केलेल्या वेगवान शतकाची आठवण करून देत, युएईविरुद्ध १७१ धावांची धमाकेदार शतकी खेळी केली आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले असून, मैदानात पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.


सामन्याची वेळ


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना आज दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक बरोबर १० वाजता होईल.


भारतीय १९ वर्षांखालील संघ :


आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश पनगालिया, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, उद्धव मोहन, नमन पुष्पक, वेदांत त्रिवेदी, किशन कुमार सिंह, आरोन जॉर्ज, युवराज गोहिल.


पाकिस्तानी १९ वर्षांखालील संघ :


फरहान युसूफ (कर्णधार), उस्मान खान, हुजैफा अहसान, हमजा जहूर (यष्टीरक्षक), मोहम्मद सय्यम, अली हसन बलोच, दानियाल अली खान, समीर मिन्हास, अली रझा, मोमीन कमर, अब्दुल सुभान, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद शायन, नकाब शफीक, अहमद हुसैन.

Comments
Add Comment

भारत - दक्षिण आफ्रिकेचा आज धर्मशालात महामुकाबला

मालिकेवरील वर्चस्वासाठी चुरस; १-१ बरोबरीमुळे महत्त्व मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२०

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी

दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ‘पलटवार’

चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१