रायगडमधील ईव्हीएम स्ट्राँग रूम उंदरांनी फोडली?

कपाटाचे दरवाजे उघडल्याने एकच खळबळ


अलिबाग : येत्या २१ डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. पण त्या आधीच सुरक्षा रक्षक आणि उमेदवारांच्या पहाऱ्यात असलेली स्ट्राँग रूम फोडल्याचा प्रकार, रायगडच्या पेणमध्ये समोर आला. पण ही स्ट्राँग रूम कोणी माणसाने नाही तर चक्क उंदरांनी फोडली आहे. हा सर्व प्रकार स्ट्राँग रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकाराने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.


रायगड जिल्मह्याधील पेणच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ज्या कपाटावर ठेवल्या आहेत, त्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये उंदरांचा हा सर्व प्रताप उघडकीस आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


राज्यातल्या बहुतांश भागात ईव्हीएम स्ट्राँग रूमबाहेर विविध पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून कडक पहारा दिला जात असल्याचे चित्र आहे. मात्र, अकोल्यात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अकोल्यातल्या चार नगरपालिका आणि एका नगरपंचायत अशा पाचही ठिकाणी ईव्हीएम स्ट्राँग रूमबाहेर २४ तास कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्याच्या तापमानाचा पारा दहा अंशांच्या आसपास पोहोचला आहे, तर ग्रामीण भागातले तापमान दहा अंशांच्या खाली आहे.


या कडाक्याच्या थंडीतही पोलीस डोळ्यांत तेल घालून स्ट्राँग रूमबाहेर कडक पहारा देत आहेत. अकोल्यातील अकोट, हिवरखेड, मूर्तीजापूर, बार्शी टाकळी आणि तेल्हारा या पाचही ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे.


नाशिकच्या मनमाडमध्ये स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवावे अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केली आहे. २१ डिसेंबर २०२५ ला नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे, तोपर्यंत ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ नये यासाठी जामर बसवण्याची मागणी विविध पक्षांच्या उमेदवारांनी केली. जॅमर जर बसवला नाही तर ठाकरेसेना, राष्ट्रवादी आणि विविध पक्षांचे उमेदवारांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.


बुलढाण्यातील सर्व दहा स्ट्राँग रूमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १० नगर परिषदांच्या मतदान प्रक्रियेचा टप्पा २ डिसेंबरला पार पडला आहे. त्यानंतर मशीन दहा ठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक स्ट्राँग रूमच्या बाहेर एकावेळी २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा आणि सशस्त्र एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


रायगड जिल्ह्यातील पेणमधील स्ट्राँग रूम उंदरांनी फोडल्याचे कळताच काही जागरूक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतपेट्या असलेल्या ठिकाणी धाव घेत स्ट्राँग रूम परिसराची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. नागपूर अधिवेशनात रविवारी अखेरचा दिवस असतानाच उंदरांचा प्रताप उघड झाल्याने नागपूरच्या थंडीतही या घटनेमुळे राजकीय गप्पांमध्ये उपहासात्मक वादाचा कलगीतुरा झडल्याचे पाहावयास मिळाला.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका एक्सिट पोलनंतर शेअर बाजारात 'कुशन' सेन्सेक्स २५५.६१ व निफ्टी ६४ अंकाने उसळला

मोहित सोमण: जागतिक स्थितीसह भारतातील राजकीय स्थितीत सापेक्षता निर्माण झाल्याने सकाळच्या सत्रात शेअर बाजारात

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दि.15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९,१७,१२३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; एकूण ५५.५९ टक्के टक्के मतदान

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा