ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान वारंवार 'तारीख पे तारीख' मिळत असल्याने ग्राहकांना न्यायासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्राहक संरक्षण कायदा तसेच ग्राहक न्यायालयांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मुंबई प्राहक पंचायत आगि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील 'ग्राहक भवन' येथे झालेल्या दिवसभराच्या विचारमंथनात या तिन्ही संस्थांच्या ज्येष्ठ प्रतिनिधींनी संभाव्य दुरुस्त्यांवर सविस्तर चर्चा केली. ग्राहक न्यायालयांच्या आर्थिक कार्यकक्षेसठी सध्या असलेला मोबदला हा निकष रद्द करून, तक्रारीचे एकूण मूल्य आणि मागितलेली भरपाई यावर आधारित कार्यकक्षा ठरवावी, अशी मागणी केली. तक्रार निवारण प्रक्रियेत प्रत्येक टप्यावर कड़क कालमर्यादा लागू करून १० दिवसांत न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.

वकिलांच्या उपस्थितीमुळे सुनावणीत विलंब होत असल्याने ग्राहक न्यायालयांतील त्यांचा प्रवेश मर्यादित किंवा नियमनबद्ध करण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याशिवाय तक्रार दाखल करण्यापूर्वी मध्यस्थीची कायदेशीर तरतूद, ग्राहक संस्थांना आयोगांमध्ये प्रतिनिधित्व देणे आणि ग्राहक न्यायालयांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण या मुदघांवरही एकमत झाले. या बैठकीस डॉ. विजय लाड, अॅड. शिरीष देशपांडे, सूर्यकांत पाठक, अरुण बाघमारे, विजय सागर, अॅड. सुरेंद्र सोनवणे उपस्थित होते.

व्यापारी कंपन्यांच्या विमा तक्रारींमुळे ताण

पाच कोटी रुपयांपर्यंतच्या तक्रारी जिल्हा आयोगाकडे, पाच ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे आाणि दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या तक्रारी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल करण्याची सुधारणा करण्यात आली. व्यापारी कंपन्यांच्या विमा तक्रारींमुळे ग्राहक न्यायालयांवरील ताण वाढत असल्याने अशा तक्रारी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवाव्यात. मात्र, वैयक्तिक ग्राहकांच्या विमा तक्रारींवर कोणताही परिणाम होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये श्रीमद् भगवत गीता पठण करण्याची भाजपची मागणी

माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी सभागृहातील ठरावाचे स्मरण करत आयुक्तांना दिले पत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी)

केईएम रुग्णालयात आता खिलाडूवृत्तीने होणार उपचार ; दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र , लवकरच स्वतंत्र क्रीडा विभाग करणार सुरु

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा

मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम