मुंबईत भर रस्त्यात पतीने केली पत्नीची हत्या

मुंबई : अंधेरी पूर्व भागातील सागबाग रोडवरील आराध्या रुग्णालयासमोर शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली. राजेश एकनाथ छत्रे या ४६ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून पत्नी पंचभिला राजेश छत्रे या ३८ वर्षीय महिलेची भर रस्त्यात हत्या केली. पतीने पत्नीवर चाकूने घातक वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या पंचभिला राजेश छत्रे यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला.


या प्रकरणात अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी राजेश एकनाथ छत्रे याला अटक केली आहे. भर रस्त्यात हत्या झाल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते पण आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही फूटेज तसेच फॉरेन्सिकच्या दृष्टीने महत्त्वाचे नमुने आणि पुरावे यांचे संकलन केले आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू पण जप्त करण्यात आला आहे. पंचभिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३७(१)(अ) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA