'सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तात्काळ निकाली काढा'

मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांनी दिले.


राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. या बैठकीस राज्यसफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, समाज कल्याण उपायुक्त स्वाती इथापे, सामाजिक न्याय विभागाच्या अवर सचिव प्रज्ञा देशमुख, सहायक संचालक मुंबई शहर प्रसाद खैरनार, सहायक संचालक मुंबई उपनगर रविकिरण पाटील तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल म्हणाले, पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पात्र कुटुंबांना शासनाच्या तरतुदीनुसार पूर्ण नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्याला नोकरी देणे अपेक्षित आहे, त्या बाबीही तत्काळ मार्गी लावाव्यात. लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांनी तात्काळ करावी. ज्या महानगरपालिका अथवा नगरपालिका याबाबत अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. राज्यात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांची संख्या किती आहे, यासंदर्भातील सविस्तर अहवाल प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिका यांनी सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तीन महिन्यांनंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून, ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


राज्यसफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर म्हणाले, महाराष्ट्रात लाड-पागे समिती यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ ज्या सफाई कामगारांना मिळालेला नाही याबाबत कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांचे नुकसान भरपाई बाबतचे अनेक प्रकरण प्रलंबित आहेत याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. या बैठकीत मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात, सफाई कामगारांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तसेच प्राप्त झालेल्या तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली.

Comments
Add Comment

Mumbai Monsoon BMC : मुंबईत मुसळधार पाऊस; महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

- मालाड मालवणीत ३४० तर शहरांत परळ भागांत ३३४ मिमी पाऊस मुंबई (विशेष प्रतिनिधी ) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेल पुन्हा धावणार! ९ महिन्यांनंतर सेवांना हिरवा कंदील; भाडेवाढीचाही प्रस्ताव

मुंबई : तब्बल ९ महिन्यांच्या खंडानंतर मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail) सेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mumbai Monsoon Red Alert : मुंबई आणि पालघरला 'रेड अलर्ट'; पुढील ३ तास धोक्याचे; विजांचा कडकडाट, ताशी ६० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई : आज म्हणजेच २४ जून बुधवारी भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत

Tata Institute in Deonar : देवनारमध्ये टाटा संस्थेच्यावतीने कौशल्य विकासाचे धडे

- महापालिकेच्यावतीने सहा मजली इमारत संस्थेला भाडेतत्वावर देणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : देवनारमधील तळ अधिक सहा

BMC News : मुंबईतील सर्व नैसर्गिक तलाव, जलाशयांचे पुनरुज्जीवन करा

- यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आमदार अमित साटम यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शहरातील पाणीटंचाईच्या

Bogus Doctors : बोगस डॉक्टर्स आणि त्यांची नेमणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाई करा

- बोगस डाॅक्टर्सच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहाचे आरोग्य बिघडले; महापालिका सभागृहाची एकमुखी मागणी मुंबई