कल्याण ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास जलद होणार

डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्टेशनजवळ १०० वा यू - गर्डरची यशस्वीरीत्या उभारणी


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारल्या जात असलेल्या मुंबई मेट्रो लाईन- १२ (कल्याण ते तळोजा) या प्रकल्पाने आणखी एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. शिळफाटा रोडवरील डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्टेशनजवळ १०० वा यू-गर्डर यशस्वीरीत्या लाँच करण्यात आला असून प्रकल्पाच्या बांधकामात हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामुळे प्रकल्पाला आणखी वेग
मिळणार आहे.


सुमारे २३.५७ किमी लांबीचा हा उन्नत मार्ग १९ मेट्रो स्थानकांद्वारे कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हरित,अखंड आणि जलद पद्धतीने जोडणार आहे. माध्यमातून ठाणे ते नवी मुंबईदरम्यान अधिक स्वच्छ, सुलभ आणि पर्यावरणपूरक गतिशीलतेचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच कळवा ते तळोजा परिसरातील ट्रान्झिट–ओरिएंटेड विकासालाही चालना मिळणार आहे. कळवा-शिळफाटा-तळोजा मार्गाला समांतर धावणारा हा कॉरिडॉर तब्बल ७ किमी एमएसआरडीसी फ्लायओव्हरच्या एकत्रित रचनेसह उभा राहत आहे. यात कोळेगावजवळील १०० मीटर मोकळा स्पॅन, महत्त्वाच्या रेल्वे आणि आरओबी क्रॉसिंग्ज तसेच २१ - २३ मीटर उंचीवरील उन्नत स्थानके अशा अभियांत्रिकी कौशल्याच्या अनेक विशेष स्पॅनचा या प्रकल्पात समावेश असेल.


दरम्यान, या प्रकल्पाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण इंटरचेंज सुविधांद्वारे प्रवासी खालील मार्गांशी सहज जोडले जातील. कळवा येथे मेट्रो लाईन ५, हेडूतने येथे मेट्रो लाईन १४, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो लाईन १ तसेच कळवा जंक्शनला सेंट्रल रेल्वेशी थेट एफओबीद्वारे जोडले जाणार आहे. हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.


मेट्रो १२ चा महत्वाचा टप्पा पूर्ण


आत्तापर्यंतची प्रगती :




  • कल्याण - मानपाडा सर्व्हे व अलाइनमेंट पूर्ण.

  •  पहिला पाईल, पियर कॅप आणि यु- गर्डर यशस्वीरीत्या कास्ट आणि उभारणी.

  •  पूर्ण क्षमतेसाठी बॅचींग प्लांट सुरू.

  •  प्रमुख भागांवर नागरी कामे आणि पियर बांधकाम वेगाने सुरू.

  •  पत्रीपूल व अमनदूत परिसरात भूमी संपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू.


विशेष स्पॅन




  • ५४ मी - एपीएमसी कल्याण मार्केट.

  • ५६ मी - रीजेन्सी अनंतम चौक.

  • ६५ मी (२ स्पॅन) - सेंट्रल रेल्वे आरओबी, पत्रीपूल.

  •  ७५ मी - तळोजा आरओबी (स्टील स्ट्रक्चर).

  • १०० मी - विरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, कोळेगाव.


Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास