महसूलमंत्री बावनकुळेंनी केली धडक कारवाई, राज्यातल्या चार तहसिलदारांसह दहा अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

नागपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेतून आदेश देत चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा एकूण दहा शासकीय अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे.


तलाठी दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार, मंडल अधिकारी संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम यांच्यासह तहसीलदार जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख अशी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केलं. निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांवर ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचा आदेशही बावनकुळे यांनी दिला.


राज्याच्या महसूल विभागाने मावळ तालुक्यातील गट क्रमांक ३६, ३७ आणि ३८ मध्ये खाणपट्टे मंजूर केले होते. इथे गौण खनिजाचं उत्खनन करण्यास परवानगी दिली होती. मात्र गट क्रमांक ३५, ४१, ४२ आणि ४६ या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचं उत्खनन झाले. याशिवाय परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले आहे. याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात दोषी आढळलेल्या दहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच पुढील तीन महिन्यात या निलंबित अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर पुढील अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाणार आहे.

Comments
Add Comment

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

केईएम रुग्णालयात आता खिलाडूवृत्तीने होणार उपचार ; दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र , लवकरच स्वतंत्र क्रीडा विभाग करणार सुरु

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार

Sydney Shooting ; सिडनीत बॉन्डी बीच वर बेछूट गोळीबार , मायकल वॉनने पोस्ट करत सांगितला अनुभव

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सुरक्षित

स्मार्ट सिटीतील प्रकल्प रखडला, कल्याणकरांची प्रतीक्षा वाढली; उड्डाणपूल कधी खुला होणार?

कल्याण : कल्याण शहरात वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न

बिहारचे रस्ते विकास मंत्री झाले भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : बिहार सरकारचे रस्ते विकास मंत्री नितीन नबीन हे भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जे. पी. नड्डा

ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर (समुद्रकिनारा) ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन