Wednesday, January 14, 2026

प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये रेकोर्ड ब्रेक वाढ - SIAM

प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये रेकोर्ड ब्रेक वाढ - SIAM

मुंबई: जीएसटीतील दरकपात, सणासुदीच्या काळातील ऑफर्स, ऑटोमोबाईल कंपन्यांकडून वाढविलेले सेल्स नेटवर्क या कारणामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या विक्रीत व निर्यातीत रेकोर्ड ब्रेक वाढ झाल्याचे नोव्हेंबर महिन्यात आकडेवारीतून दिसून आले. मागच्याच आठवड्यात इयर ऑन इयर बेसिसवर २१% पेक्षा अधिक वाढ झाल्याचे फाडा (FADA) संस्थेने स्पष्ट केले होते यात आणखी भर म्हणजे आता सियाम (SIAM) या संस्थेने पॅसेंजर व्हेईकल म्हणजेच प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे म्हटले आहे. .त्यामुळेच उत्सवाच्या काळात मागणी चांगली राहिल्याने नोव्हेंबरमध्ये कंपन्यांकडून डीलर्सना प्रवासी वाहनांची निर्यात १९% वाढली असे उद्योग संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने आज स्पष्ट केले.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात एकूण प्रवासी वाहनांची विक्री ४१२४०५ युनिट्सवर विक्री पोहोचली आहे जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील ३४७५२२ युनिट्सच्या तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर १८.७% वाढली आहे. माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये डीलर्सना दुचाकींची पाठवणी (Dispatch) २१% वाढून १९४४४७५ युनिट्सवर पोहोचली जी गेल्या वर्षी याच महिन्यात १६,०४,७४९ युनिट्स होतीअसे सियामने पुढे एका निवेदनात म्हटले आहे.याविषयीच आपल्या माहितीत मासिक कामगिरीबद्दल माहिती देताना सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले आहेत की, 'चालू सकारात्मक बाजारभाव आणि सरकारच्या प्रगतीशील जीएसटी २.० सुधारणांमुळे उद्योगाला मजबूत गती राखता आली.

प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहने - या सर्व प्रमुख श्रेणींनी २०२५ मध्ये नोव्हेंबरमधील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री गाठली आहे ' असे ते म्हणाले. मेनन पुढे म्हणाले की, सहाय्यक धोरणात्मक हस्तक्षेप आणि ग्राहकांचा विश्वास मजबूत राहिल्याने उद्योग २०२६ मध्येही आपला विकासाचा मार्ग सुरू ठेवण्याबद्दल आपलं आशावादी आहोत.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >