फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून फ्रान्स सरकारने नागरिकांना काही तासांसाठी मोफत वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.


ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, फ्रान्सच्या 'डे-अहेड मार्केट'मध्ये विजेची किंमत शून्यावर आली. यंदा युरोपात हिवाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा उबदार आहे. तापमान जास्त असल्याने नागरिकांनी हीटर आणि ब्लोअर्ससारखी उष्णता देणारी उपकरणे वापरणे कमी केले आहे. ज्यामुळे विजेची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात घटली आहे. याच दरम्यान, देशात सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे पवन ऊर्जा प्रकल्पांमधून विजेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.


फ्रान्सचे अनेक अणुऊर्जा प्रकल्प जवळपास ८५% क्षमतेने कार्यरत आहेत. या प्रकल्पांमुळे ग्रिडमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वीज जमा झाली आहे. दरम्यान वीजेसाठीची मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे फ्रान्समध्ये तात्पुरता ऊर्जा अधिशेष निर्माण झाला, परिणामी विजेचे दर शून्यावर आले आणि लोकांना प्रत्यक्षात मोफत वीज मिळाली आहे.


युरोपमध्ये ही परिस्थिती आता अधिक प्रमाणात दिसू लागली आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे उत्पादन वाढल्यामुळे आणि मागणी कमी झाल्यावर विजेच्या किमती वेगाने शून्यावर येतात आणि काहीवेळा त्या नकारात्मक स्तरावरही जातात, म्हणजे वीज वापरण्यासाठी कंपन्या ग्राहकांना पैसे देत आहेत. २०२२ मध्ये आलेल्या ऊर्जा संकटानंतर युरोपात ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.

Comments
Add Comment

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात