महाराष्ट्राचे आणखी एक ऐतिहासिक पाऊल- गुन्हेगारांना आता एआय मार्फत पकडणार ! सायबर क्राईम तपासात एआय वापरणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य

मुंबई: महाराष्ट्राने आणखी एक ऐतिहासिक पाऊल रचले आहे. पोलिस यंत्रणेला गुन्ह्यांच्या तपासासाठी ए आय तंत्रज्ञान समाविष्ट करून देणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. यासाठी एक विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या सिस्टिमचे नाव महाक्राईमओएस (MahaCrimeOS AI) ठेवलेले आहे. या माध्यमातून गुन्ह्याची झटपट उकल होण्यासाठी मोठ्या पातळीवर मदत होणार आहे. मायक्रोसॉफ्ट ए आय टूर या कार्यक्रमात या यंत्रणेचे अनावरण करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) व स्पेशल पर्पज व्हेईकल असलेले मार्वल (Marvel) यांच्या संयुक्त विद्यमाने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचे या कार्यक्रमातील घोषणेत म्हटले गेले.


ही ओएस Microsoft Azure व Open AI यांची मदत घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना गुन्ह्याची उकल करण्यास मदत करतील. नागपूरसह इतर २३ पोलिस स्थानकात ही यंत्रणा बसवली गेल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जनतेच्या हितासाठी नैतिक आणि जबाबदार एआय हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. एआयमध्ये कार्यक्षमता सुधारून, जीवनमान वाढवत प्रत्येक नागरिकासाठी खऱ्या अर्थाने जगण्याची सोय करून परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती या यंत्रणेत आहे.' असे म्हटले.


ते पुढे म्हणाले, 'मायक्रोसॉफ्टसोबतचे आमचे सहकार्य जटिल सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचे निराकरण करण्यापासून सुरू झाले होते, परंतु त्याची क्षमता खूपच जास्त आहे. अधिक प्रभावी, नागरिक-केंद्रित राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही या शक्तीचा जबाबदारीने वापर करण्याचा मानस करतो.'


अत्याधुनिक एआय-संचालित तंत्रज्ञान पोलिस अधिकाऱ्यांना एआय बेसद्वारे त्वरित डिजिटल केस फाइल्स तयार करण्यास अनेक भाषांमध्ये डेटा काढण्यास आणि संदर्भात्मक कायदेशीर समर्थन मिळविण्यास ही यंत्रणा मदत करणार आहे.शिवाय, ही प्रणाली संबंधित प्रकरणांशी आधारित पोलिस यंत्रणेला डिजिटल पुराव्यांचे अधिक कार्यक्षमतेने विश्लेषण करण्यास मदत करते.


लाँचची घोषणा करताना, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन, सुरक्षा आणि कार्यक्षमता कशी वाढवू शकते यावर चर्चा केली. राज्य पोलिसांसोबत मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याबद्दल बोलताना, सीईओ सत्या नाडेला म्हणाले की,'हे सहकार्य सार्वजनिक प्रणालींमध्ये जबाबदार नवोपक्रमावर वाढत्या लक्ष केंद्रित करेल.'


राज्य पोलिसांच्या वतीने बोलताना, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि मार्व्हेलचे सीईओ हर्ष पोद्दार 'महाक्राइमओएस एआय आपण सायबर गुन्ह्यांशी कसे लढतो याची पुनर्परिभाषा (Redefine) करत आहे. जटिलतेला स्पष्टता आणि गतीमध्ये बदलत आहे. हे व्यासपीठ केवळ जलद तपासांबद्दल नाही ते विश्वास निर्माण करण्याबद्दल, प्रशासनासाठी नवीन मानके (Standards) स्थापित करण्याबद्दल आणि संपूर्ण भारतात पसरू शकेल असे मॉडेल तयार करण्याबद्दल आहे.'असे म्हटले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न