घोडबंदर रोडवर उद्यापासून वाहतुकीत बदल

ठाणे : घोडबंदर परिसरातील गायमुख रोडची खालावलेली अवस्था लक्षात घेऊन महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी १२ ते १४ डिसेंबरदरम्यान डीबीएम आणि मास्टिक पद्धतीने रस्ता दुरुस्तीचे काम होणार असल्यामुळे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विकेंडच्या दरम्यान पुन्हा एकदा ट्रॅफिक जामची शक्यता ठाणे वाहतूक विभागाने व्यक्त केली आहे.


मुंब्रा-कळवा बेल्टमधून येणाऱ्या वाहनांना निर्बंध : मुंब्रा आणि कलवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाक्यावर प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहने खारेगाव खाडी ब्रिज →खारेगाव टोलनाका → मनकोली →अंजुरफाटा या मार्गाने पुढे पाठवली जातील. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा डोकेदुखी: ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात जड वाहनांमुळे वारंवार ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते. नागरिकांनी अनेकदा आंदोलने करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षीही स्थानिकांनी मोठे आंदोलन केले होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर व नवी मुंबई पोलिसांसोबत बैठक घेऊन जड वाहन वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले होते. आता गायमुख रोडच्या दुरुस्तीमुळे पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.


शुक्रवारपासून असे असतील बदल : शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून कासरवडवली ट्रॅफिक उपविभाग मर्यादेत येणाऱ्या गायमुख-नीरा केंद्र, काजूपाडा ते फाउंटन हॉटेलदरम्यान दुरुस्तीचे काम सुरू होईल. हे काम रविवार, १४ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत जड वाहने पर्यायी मार्गांनी वळवली जातील.

Comments
Add Comment

मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

ठाणे : उत्तर भारतीयांना उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये उत्तर सभा घेतली

बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणातील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल  बदलापूर :  सह्याद्री सुपर सपेशालिस्ट

ठाण्यात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणीकपात

पाइपलाइन फुटल्याने पुरवठा विस्कळीत ठाणे : कळवा फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या कामादरम्यान

ठाणे घोडबंदर रोडवर आज वाहतूक कोंडीची शक्यता

दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदी ठाणे : ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी