ठाणे जिल्ह्यात ATS ची छापेमारी,साकीब नाचनच्या गावात मध्यरात्रीपासून झडती

ठाणे : दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाला लागून असलेल्या बोरीवली या गावात बुधवारी रात्री उशिरा धाडी टाकण्यात आल्या. पडघा लगत असलेल्या बोरीवली गावातील अनेक घरांमध्ये तपास पथके दाखल झाली असून रात्रभर झडती घेण्यात आली.


साकीब नाचनच्या अटकेनंतर कारवाईला वेग


काही दिवसांपूर्वी साकीब नाचन याला एटीएसने अटक केल्यानंतर या कारवाईला अधिक वेग आला आहे. साकीब नाचन हा भिवंडी जवळील बोरीवली गावचा रहिवासी होता. एटीएसने केलेल्या तपासानुसार, साकीब हा स्लिपर सेल बनवण्यात आणि तरुणांची माथी भडकवण्यात पटाईत होता.


‘अल शाम’ नावाचा स्वतंत्र देश


मिळालेल्या माहितीनुसार, साकीब नाचन याने बोरीवली हे गाव 'वेगळा देश' म्हणून घोषित केला होता. या गावाला त्याने ‘अल शाम’ असं नाव दिलं होतं. इतकेच नव्हे, तर या 'अल शाम'साठी साकीबने स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आणि स्वतंत्र मंत्रिमंडळ देखील तयार केलं होतं.

Comments
Add Comment

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

'निफ्टी' टेक्निकल विश्लेषण: 'या' कारणामुळे आज निफ्टी २६१९०-२६३०० पातळीच्या आसपास स्थिरावण्याचे तज्ञांचे संकेत

मोहित सोमण: आज शेअर बाजारात जबरदस्त संकेत मिळतच आहेत. वित्तीय पतधोरण समितीने (FOMC) २५ बेसिस पूर्णांकाने कपात

महायुतीमुळे आरक्षणाचा पेच सुटला, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ओबीसी प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारने आरक्षणाचा पेच सोडवला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची अनेक वर्षांपासूनची

आजपासून Exim Routes व Stanbik Agro SME IPO बाजारात दाखल!यात गुंतवणूक करावी का? जाणून घ्या एका क्लिकवर सगळच

मोहित सोमण: आजपासून एक्सिम रूटस लिमिटेड (Exim Routes) व स्टॅनबिक अँग्रो लिमिटेड (Stanbik Agro Limited) हे दोन एसएमई म्हणजेच छोट्या

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

रूपया 'घसरता घसरता घसरे' सकाळी रुपया ९०.५६ रूपये निचांकी पातळीवर

मोहित सोमण: युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातींनंतर रूपयात भलताच दबाव निर्माण झाला. ज्याचा फटका अद्यापही दिसत