AMFI November Data: म्युच्युअल फंड इक्विटी गुंतवणूक अस्थिरतेतही जबरदस्त वाढ मिड व स्मॉल कॅप गुंतवणूकीत वाढला कल तर सोन्याच्या गुंतवणूकीत घसरण

मोहित सोमण: जागतिक व स्थानिक अस्थिरतेतही भांडवली गुंतवणूकीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एएमएफआय (Association of Mutual Fund Investment) दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यातील तुलनेत नोव्हेंबर इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक महिन्यात महिन्यातील आधारे (Month on Month MoM) २१% वाढ झाली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात २४६९०.३३ कोटी गुंतवणूकीची आवक (Inflow) बाजारात झाली आहे. लार्जकॅप म्युच्युअल फंड गुंतवणूकीत मात्र ऑक्टोबर महिन्यातील ५२९३.२७ कोटींच्या आवक तुलनेत नोव्हेंबर महिन्यात ४९४२.३६ कोटीची वाढ झाली आहे.


मात्र ऑक्टोबर महिन्यातील तुलनेत मिड व स्मॉल कॅप म्युच्युअल फंड गुंतवणूकीत वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरमध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ८१६९.०३ कोटी व ७६६०.९९ कोटींची पोर्टफोलिओ गुंतवणूक नोंदवली होती ती नोव्हेंबर महिन्यात वाढत अनुक्रमे ८२२६.१४ व ८१०६.९२ कोटींवर वाढली. एसआयपी गुंतवणूकीत ऑक्टोबर महिन्यातील २९५२९ कोटींच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये २९९११ कोटींवर वाढ नोंदवली गेली आहे. मिड व स्मॉल कॅप फंडात अनुक्रमे ४४८६.९१ व ४४०५.९० कोटींची आवक वाढली आहे. तसेच सेक्टोरल व थिमॅटिक फंडातही १८६४.९९ कोटींची आवक वाढली आहे. सर्वाधिक वाढ लार्ज व मिड कॅप फंडात झाली आहे. यंदा या फंडात ४५०३.३१ कोटींवर आवक वाढली आहे जी ऑक्टोबर महिन्यात ३१७७.०७ कोटी रूपये होती. त्यांना एकूण ४५०३ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली, जी गेल्या महिन्यातील ३१७७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत मासिक आधारावर ४२% वाढ दर्शवते.


विशेष म्हणजे गोल्ड ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत घसरण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात गोल्ड ईटीएफ आवक ७७४३.१९ कोटी रूपये होती जी नोव्हेंबर महिन्यात ३७४१.७९ कोटी रूपये आहे. इतर ईटीएफ गुंतवणूकीत ऑक्टोबर महिन्यातील ६१८१.७० तुलनेत नोव्हेंबर महिन्यात ९७२०.७४ कोटीवर वाढ झाली आहे.


एकूण म्युच्युअल फंड गुंतवणूकीतील ११ प्रकारापैकी डिव्हिडंड यील्ड आणि ईएलएसएस फंडांव्यतिरिक्त इतर सर्व श्रेणींमध्ये गुंतवणूक वाढली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. फ्लेक्सी कॅप फंडांनी पुन्हा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आणि ऑक्टोबरमधील ८९२८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ८१३५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली ज्यामध्ये गेल्या महिन्यातील तुलनेत ९% घट दिसून आली.


माहितीनुसार, हायब्रीड फंडांच्या मासिक गुंतवणुकीत ऑक्टोबरमधील १४,१५६ कोटी रुपयांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ६% घट होऊन ती १३२९९ कोटी रुपयांवर पोहोचली आली. कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंडांव्यतिरिक्त इतर सर्व श्रेणींमध्ये या कालावधीत गुंतवणूक आली.


एकूणच या वर्षी सुमारे २४ नवीन ओपन-एंडेड म्युच्युअल फंड सुरू करण्यात आले. एकत्रितपणे पोर्टफोलिओ पाहता फंड मॅनेजरने गुंतवणूकदारांकडून ३१२६ कोटी रुपये जमा केले आहेत आणि यामध्ये सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांचे सर्वाधिक १९८२ कोटी रुपयांचे योगदान होते. नोव्हेंबर महिन्यात चार सेक्टोरल आणि थिमॅटिक फंड सुरू करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव

नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या