बिबट्यांना पकडण्यासाठी ३० गावांत ५१ पिंजरे

निरगुडसर  : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावांत ५१ पिंजरे वनविभागाने तैनात केले आहेत. त्यामध्ये निरगुडसर, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, खडकी, पिंपळगाव ही गावे बिबट्यांची हॉटस्पॉट केंद्र बनली आहेत. आठ गावातच २५ पिंजरे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी बसवण्यात आले आहेत. ' या वनपरिक्षेत्रात ५५ गावे येत असून या भागात सर्वाधिक असलेला ऊसपट्टयात बिबट्या दबा धरून बसतो. घोडनदी आणि मीनानदी पात्र जवळ असल्याने पिण्यासाठी पाणी आणि सावज शेताच्या बांधाजवळच मिळत असल्याने बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले म्हणाले की, ''मंचर वनपरिक्षेत्रात एकूण ५५ गावे येतात, यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच ५५ गावांसाठी अवघे २० पिंजरे होते त्यामुळे पिंजरे लावण्यात अडचणी येत होत्या. सरकारकडून नव्याने ३६ पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत