दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार करण्यात हातभार लागेल, असे निवेदन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केले.


महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भुरचनेचे यूनेस्कोचे मानांकन आपण या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखाली आपण मिळवले. हा वारसा मूर्त स्वरूपाचा आहे. आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने वर्ष 2025-26 साठी दीपावलीचे नामांकन केले होते. अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे, असे शेलार यांनी नमूद केले.


मराठी परंपरेशी अतूट नाते

  •  दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे. या सणाचा इतिहास निश्चित प्राचीन आहे. निसर्गावर आधारित साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात. यामुळे भारतीय सण, परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे.

  •  आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री मा. गजेंद्र सिंह शेखावत जी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले, असे नमूद करीत मंत्री शेलार यांनी सभागृहाच्या माध्यामातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर