बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार


ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच, नामदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेवरून, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कडक पावले उचलत घोडबंदर रोडसह महत्त्वाच्या मार्गांवर बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. येत्या काही दिवसांत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीमही राबवली जाणार आहे.


प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या आदेशानुसार वायुदत पथक क्रमांक १ ते ५, तसेच १० मोटार वाहन निरीक्षकांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शीतपेय गाड्या, ट्रॅव्हल्स, खासगी बस, वजनदार वाहने तसेच नियमबाह्य पार्किंग, परवाना नोंदणीतील त्रुटी, ध्वनी-प्रदूषण वाढवणारे फेरफार अशा नियमभंगांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर
यांनी दिली.


अनेक वाहनचालकांकडून हेल्मेट न वापरणे, लेनची शिस्त न पाळणे, दुचाकींवर तिघे जण बसवणे, अवैधपणे मालवाहतूक करणे असे प्रकार नियमितपणे दिसत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘विशेष तपासणी मोहीम’ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, दररोज कडक दंडात्मक कारवाई, वाहन जप्ती, परवाना रद्द करणे अशा कठोर दंडांची तरतूद केली जाणार आहे.



Comments
Add Comment

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक

शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक