PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली आहे. तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता हा अपघात झाला.
काय आहे घटना?


मृत्यू झालेल्या मुलीचे नाव सुधा बिहारीलाल वर्मा (९) असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव राधा राममनोज वर्मा असे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालक किरण भटू पाटील याला ताब्यात घेतले आहे. राधा आणि तिचा पती तळवडे येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. राधा गरोदर असल्याने मदतीसाठी तिच्या लहान बहीण सुधाला दोन महिन्यांपूर्वी गावावरून बोलावून घेतले होते.त्यांचा भाऊ देखील त्यांच्यासोबत राहतो आणि तोही खासगी कंपनीत नोकरी करतो.


राधाचा पती रात्रपाळी करून घरी झोपला होता,तर राधा कामावर गेली होती.दुपारी एकच्या सुमारास ती घरी परतली.तिने जेवण केले आणि कामावर परत जाण्यासाठी ती लहान बहीण सुधाला सोबत घेऊन पायी निघाली होती.दोघी बहिणी रस्ता ओलांडत असतानाच,भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएलच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुधा गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर, तिची गरोदर बहीण राधादेखील गंभीर जखमी झाली.तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

ॲमेझॉन इंडिया ने आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर केला सहकार्य करार

- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत बंगळुरु : आंतरराष्ट्रीय

मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगीची भागीदारी; दैनंदिन जीवनात मिळणार आनंद

स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे मुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून