कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाची गोष्ट म्हणजे २० ते २५ लोकांपैकी कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, जीवितहानी सुद्धा झाली नाही.


शहरातील केएसबीपी चौकातून सायबर चौकाकडे येणाऱ्या ऊसाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक दुभाजकाला धडकला. ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या चार कार सोबतच एका टेम्पोला ट्रकने धडक दिली. त्यानंतर याच ट्रकने एका बसला अलगद ठोकर दिली.
अपघातात ट्रक चालकासह कार आणि टेम्पोतील चौघे किरकोळ जखमी झाले. बसमध्ये जवळपास २० ते २५ माणसे होती. सुदैवाने यातील कुणालाही गंभीर जखम झालेली नाही.


अपघातात ट्रकखाली कार सापडून ती पूर्णपणे नाहीशी झाली .कारमधील सुनील रेडेकर हे थोडक्यात बचावले. त्यांना दुचाकीवरील दोन तरुणांनी तातडीने कारच्या काचा फोडून बाहेर काढले. राजारामपुरी पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमींना तातडीने बाहेर काढले.

Comments
Add Comment

Shirdi New Year 2026 : शिर्डीत साईनामाच्या जयघोषात नववर्षाचे स्वागत! तरुण पिढीची साईचरणी मांदियाळी; साईनगरी भाविकांनी दुमदुमली

शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण साईनगरी सज्ज झाली होती.

कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती

नऊशे किलो शेंदूर हटवून ऐतिहासिक स्वरूपाचे दर्शन पुणे : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर