बीएमसी शाळा खासगीकरण वादाने अधिवेशन तापले; अस्लम शेख–लोढा आमनेसामने

नागपूर : मालवणीतील बीएमसी टाऊनशिप शाळेच्या मुद्द्यावरून मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. या वादाचे पडसाद थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. मुंबईतील बीएमसी शाळांच्या व्यवस्थापन आणि खासगीकरणाच्या शक्यतेवरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.


विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अस्लम शेख यांनी त्यांच्या मतदारसंघातील बीएमसी टाऊनशिप शाळा खासगी संस्थेला देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. शासनाने महापालिका शाळांचे खाजगीकरण करण्याचा काही निर्णय घेतला आहे का, असा त्यांच्या प्रश्नाचा मुख्य मुद्दा होता. या निर्णयाच्या विरोधात पालकांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या आंदोलनाचीही त्यांनी आठवण करून दिली आणि शासनाने या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई केली का, अशी विचारणा केली.


शेख यांनी पुढे सांगितले की, दत्तक शाळा धोरणानुसार त्यांच्या मतदारसंघातील एक व्यवस्थित चालणाऱ्या शाळेत अचानक शिक्षक बदलण्यात आले. सीबीएसई वर्ग असलेल्या या शाळेत १० वी आणि १२ वीचे शिक्षक बदलल्यामुळे पालकांनी आंदोलन केले. यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या शाळेत फी आकारली जाणार असा पालकांचा गैरसमज झाला होता, असे सांगितले. मात्र, हे उत्तर चुकीचे असल्याचा आरोप शेख यांनी केला आणि शाळेची माहितीच चुकीची देण्यात आल्याचे म्हटले. त्यामुळे सभागृहात वातावरण तापले.


मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, महापालिकेचे शाळा दत्तक धोरण २००७ मध्ये लागू झाले होते आणि त्यानुसार अनेक शाळा विविध संस्थांना देण्यात आल्या. मालवणीतील ही शाळा आधी फजलानी ट्रस्टकडे होती, परंतु ट्रस्टने शाळा चालवण्यास नकार दिल्यानंतर ती प्रयास फाऊंडेशनकडे देण्यात आली. प्रयास फाऊंडेशननंतर विद्यार्थ्यांचा निकाल सुधारल्याचेही लोढा यांनी सांगितले.


यावर पुढे बोलताना लोढा यांनी अस्लम शेख यांना थेट उद्देशून टीका करत त्यांचा हेतू संशयास्पद असल्याचे म्हटले. आंदोलनाच्या वेळी ते स्वतः पालकमंत्री म्हणून हजर होते, तरी त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, माझा मुद्दा केवळ शिक्षकांच्या भरतीची कायदेशीरता आणि त्यांच्या टीईटी पात्रतेचा होता, असे शेख यांनी प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण घटनेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या मुंबईतील आमदारांमध्ये तीव्र शब्दयुद्ध झाल्याचे हिवाळी अधिवेशनात स्पष्ट दिसून आले.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास