नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप आमदारांनी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत सभागृहात खळबळ उडवून दिली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी थेट विधानसभेत हे आरोप केले. दोन्ही आमदारांनी तातडीने मुख्यमंत्र्यांकडे तुकाराम मुंढे यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी एक गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांना खुद्द तुकाराम मुंढे यांच्या नावाने धमकी मिळाल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. या गंभीर आरोपांमुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. तुकाराम मुंढे यांच्यावर झालेले हे आरोप आणि आमदारांनी केलेली कारवाईची मागणी यामुळे आता सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.