प्रतिनिधी: डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक गौप्यस्फोट व्हाईट हाऊसमध्ये केला आहे. पत्रकारांशी बोलताना भारताने तांदूळाचे डंपिंग युएसमध्ये करू नये या आशयाचे विधान केले आहे. युएस मधील शेतकऱ्यांना भारत, व्हिएतनाम, कॅनडा येथील शेतकी आयातीतील स्पर्धात्मक किंमतीमुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना बाजारात टिकणे मुश्कील झाले आहे. परिणामी अमेरिकेतील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तसेच युएसची तिजोरीत वाढ करून स्थानिकांना न्याय देण्यासाठी नवे आयात धोरण आखले जाईल असे ट्रम्प यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात अमेरिकेला होतो. त्यावर ट्रम्प प्रशासन मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ) वाढवणार आहे. एकीकडे भारतीय शिष्टमंडळाने या आठवड्यात युएस कडून लादल्या गेलेल्या अतिरिक्त २५% दरकपातीसाठी चर्चेतून प्रयत्न सुरू केलेले असताना ट्रम्प यांचे विधान आणखी संभ्रम निर्माण करणारे आहे. कारण ट्रम्प यांच्या नव्या निर्णयानुसार अनेक शेतकी उत्पादनातील करात वाढ होऊ शकते.
"भारतीय तांदूळ अमेरिकेत टाकण्याची आम्ही 'काळजी' घेऊ असे विधान ट्रम्प यांनी केल्याने अनेक अमेरिकन तांदूळ उत्पादकांचा असा विश्वास आहे की भारत, व्हिएतनाम आणि थायलंडसारखे देश त्यांचे तांदूळ कमी किमतीत विकत आहेत. ज्यामुळे अमेरिकन तांदळाच्या किमती घसरत आहेत. व स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.'त्यांनी डंपिंग करू नये' असे ट्रम्प म्हणाले. 'मी इतरांकडून असे ऐकले आहे. तुम्ही ते करू शकत नाही' अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांच्याकडे वळून ट्रम्प यांनी विचारले, 'भारताला असे करण्याची परवानगी का आहे (अमेरिकेत तांदूळ टाकणे)? त्यांना शुल्क भरावे लागते. त्यांना तांदळावर सूट आहे का? ज्यावर बेसेंट यांनी उत्तर दिले, 'नाही, साहेब. आम्ही अजूनही त्यांच्या व्यापार करारावर काम करत आहोत. ट्रम्प यांनी पुन्हा सांगितले,' त्यांनी (तांदूळ) टाकू नये ते ते करू शकत नाहीत.' त्यामुळे भारतावरील ट्रम्प यांनी नाराजी पुन्हाऐकदि स्पष्ट झाली आहे.
एकीकडे मोठ्या प्रमाणात युएस बाजारातील महागाईचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे स्थानिकांच्या मदतीने चलनवाढ रोखणे, तसेच अमेरिकेन व्यापारांना सवलती देत वस्तूंच्या किंमतीत नियंत्रण रागणे अशी दोन्ही आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. शेतकरी व शेतकी तज्ञांच्या शिष्टमंडळाने व्हाईट हाऊसला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. अमेरिकन शेतकरी अमेरिकेसह जगभरातील राष्ट्रांना अन्न पुरवू शकतात, परंतु 'आपल्याला मुक्त व्यापाराची नव्हे तर निष्पक्ष व्यापाराची गरज आहे' असेही ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
एकूण व्यापारीतील भारत हा तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. १५० दशलक्ष टन उत्पादन केवळ भारत करतो आणि जागतिक बाजारपेठेत त्याचा वाटा २८% आहे. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये जागतिक निर्यातीत भारताचा वाटा ३०.३% होता, असे इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशन (IREF) च्या आकडेवारीवरून दिसून येते.
इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन (IBEF) च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, २०२४ च्या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला सुमारे २.३४ लाख टन तांदूळ निर्यात केला जो त्याच्या एकूण जागतिक बासमती तांदळाच्या निर्यातीच्या ५% पेक्षा कमी आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेम गर्ग यांनी म्हटले आहे की,'२५% परस्पर शुल्काला तांदळाच्या निर्यातीसाठी तात्पुरती "अडथळा" म्हटले होते आणि व्हिएतनाम आणि पाकिस्तानसारख्या स्पर्धकांपेक्षा भारताला अजूनही किंमत प्राधान्य आहे. ही करवाढ दीर्घकालीन अडथळा नाही, तर तात्पुरती अडचण आहे. धोरणात्मक नियोजन, विविधीकरण आणि लवचिकतेसह, भारतीय तांदूळ निर्यातदार अमेरिकन बाजारपेठेत त्यांची उपस्थिती संरक्षित करू असे म्हटले होते.