फलटणच्या डॉक्टर महिला प्रकरणात सभागृहात मोठा खुलासा! मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना उत्तर

नागपूर: मागील काही महिन्यांपूर्वी फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आणि काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी डॉक्टरवर दबाव टाकला जात होता का? फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपींवर मकोका लागणार का? आरोपींची तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का? महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था उभी केली जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.


आपण या महिलेच्या बाबतीत ६० दिवसात चार्जशीट दाखल करणार आहोत. सदर महिला डॉक्टर या ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने रुजू होत्या. फॉरेन्सिकच्या रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेनेच हातावर सुसाईड नोट लिहिली होती. आरोपी बदनेने डॉक्टर महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केले होते. शोषण झाल्यावर बदनेने वेगळी भूमिका घेतली, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.



तसेच या प्रकरणात जेवढी नावं घेण्यात आली तेवढ्या सगळ्यांची चौकशी करण्यात आली आहे. काही लोकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीत राजकारण चालत नाही. या प्रकरणात पारदर्शी पद्धतीने चौकशी झाली. कुणालाही सोडले गेले नसून सर्वांची चौकशी होईल. पोलिसांकडे महिलेचे हॉटेलवर जाईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही आहेत. फॉरेन्सिक पुरावे जमा केले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान, दुसऱ्या आरोपीने देखील शोषण केले होते. त्यामुळे डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, असे फडणवीस म्हणाले. या प्रकरणात दुसरी कोणतीही बाजू नाही. कारण महिलेने आत्महत्याच केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

विदर्भ, मराठवाड्यातील रस्त्यांचे निकष कोकणाला लावू नका!

कोकणातील रस्त्यांच्या दूरवस्थेवरून आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडडले नागपूर : कोकणातील रस्त्यांची सातत्याने

IAS तुकाराम मुंढे भ्रष्टाचारी? भाजप आमदारांचा विधानसभेत गंभीर आरोप

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप आमदारांनी गंभीर

शासकीय कार्यालयांत यूडीआयडी कार्ड सक्ती; बोगस प्रमाणपत्रधारकांवर कडक कारवाई सुरू - मंत्री अतुल सावे

नागपूर : राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व विभागांमध्ये युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड सादर करणे ९  ऑक्टोबर

राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 वसतिगृहे सुरू; उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्येही जागा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुलींच्या वसतीगृहातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ, डेअरीच्या जागांचाही वसतीगृहासाठी वापर - इतर मागास व बहुजन कल्याण

राज्यावर बिबट्याचे सावट! नागरिक आणि वनविभागाच्या अडचणीत वाढ, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

अमरावती: राज्यात सध्या राजकारण सोडून दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो बिबट्या! कारण २९ जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे

baba adhav passed away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढावांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे : राज्यातील पुरोगामी चळवळीला आणि शेतकरी-कामगार वर्गाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा